
फोटो सौजन्य: Gemini
देशात इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांची विक्री झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्यांची संख्येत वाढ होत आहे. मात्र, सध्या या विभागात मर्यादित खेळाडू आहेत. दरवर्षी नवीन कंपन्या सामील होत आहेत. उदाहरणार्थ, या वर्षी टेस्ला आणि विनफास्ट यां विदेशी ऑटो कंपन्यांनी भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारात प्रवेश केला.
२०२५ च्या आर्थिक वर्षातील इलेक्ट्रिक चारचाकी वाहनांच्या विक्री अहवालाबद्दल बोलायचे झाले तर, टाटा मोटर्स ही सर्वाधिक इलेक्ट्रिक कार विकणारी कंपनी ठरली आहे. एमजी मोटर्स आणि महिंद्रा यांचा टॉप-3 मध्ये समावेश होता. या विभागाच्या आर्थिक वर्ष 2025 च्या विक्री अहवालावर एक नजर टाकूया.
ही ऑफर सोडू नका! डिसेंबर 2025 मध्ये Kia च्या Cars वर 3.65 लाखांपर्यंतचे Discount
FY2025 मध्ये भारतातील इलेक्ट्रिक फोर-व्हीलर विक्रीत टाटा मोटर्सने पहिले स्थान पटकावले आहे. या आर्थिक वर्षात टाटाने एकूण 61,443 इलेक्ट्रिक कार्सची विक्री करत बाजारात आपले वर्चस्व कायम ठेवले. दुसऱ्या क्रमांकावर MG असून कंपनीने 36,585 इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली. तिसऱ्या स्थानावर महिंद्रा असून त्यांच्या 12,890 इलेक्ट्रिक कार्स ग्राहकांपर्यंत पोहोचल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर ह्युंदाई असून कंपनीने 3,970 युनिट्सची विक्री नोंदवली, तर किआ कंपनीने 828 इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आहे. एकूणच FY2025 मध्ये भारतात 115,716 इलेक्ट्रिक फोर-व्हीलर्सची विक्री झाली असून, देशातील इलेक्ट्रिक वाहन बाजार वेगाने विस्तारत असल्याचे स्पष्ट होते.
ग्राहकांच्या लाडक्या Tata Punch चा Facelift मॉडेल कधी होणार लाँच? कसे असतील फीचर्स आणि डिझाइन?
ही देशातील एक आघाडीची आणि लोकप्रिय इलेक्ट्रिक कार आहे. याची किंमत 7.50 लाख (Ex-showroom) रुपयांपासून सुरु होते. या कारमध्ये 17.3 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहे. 3.3 किलोवॅट चार्जर वापरून चार्जिंग वेळ 10% ते 80% पर्यंत 5 तास आणि 0% ते 100% पर्यंत 7 तास आहे.
टाटाची सर्वात परवडणारी टियागो इलेक्ट्रिक कार दोन ड्रायव्हिंग मोड देते. ही ईव्ही 5.7 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. यात आठ-स्पीकर सिस्टम, रेन-सेन्सिंग वाइपर्स, क्रूझ कंट्रोल, पुश-बटण स्टार्ट/स्टॉप, इलेक्ट्रिक ओआरव्हीएमएस आणि इतर अनेक फीचर्स आहेत.
टाटा पंच ईव्ही दोन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. 25 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकची प्रमाणित रेंज 421 किमी आहे, तर 35 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकची प्रमाणित रेंज 315 किमी आहे.ही ईव्ही कोणत्याही 50 किलोवॅट डीसी फास्ट चार्जरचा वापर करून 56 मिनिटांत 10 ते 80% पर्यंत चार्ज करता येते.