
फोटो सौजन्य: @RevistaMotor/ X.com
Volvo ने EX60 ला वेगवेगळ्या ग्राहक गरजा लक्षात घेऊन तीन बॅटरी पॅक पर्यायांमध्ये सादर केले आहे. यामध्ये 83kWh, 95kWh आणि 117kWh क्षमतेचे बॅटरी पॅक दिले आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, टॉप व्हेरिएंटमध्ये ही इलेक्ट्रिक SUV तब्बल 810 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे.
Volvo EX60 चा डिझाइन कंपनीच्या नव्या EV डिझाइन भाषेचे प्रतिबिंब आहे. फ्रंट लुकमध्ये ही SUV मोठ्या EX30 सारखी दिसते. समोरच्या बाजूला स्प्लिट हेडलॅम्प सेटअप, Volvo चा सिग्नेचर थॉर हॅमर LED DRL, बंपरच्या दोन्ही बाजूंना LED हेडलॅम्प, क्लोज्ड-ऑफ ग्रिल आणि खाली ब्लॅक स्कफ प्लेट देण्यात आली आहे.
साइड प्रोफाइल स्मूद आणि क्लीन ठेवण्यात आला असून, व्हील आर्च आणि दरवाजांवर हलक्या कॅरेक्टर लाईन्स देण्यात आल्या आहेत. दरवाजांच्या खालच्या बाजूला ब्लॅक क्लॅडिंग आहे. पारंपरिक डोअर हँडलऐवजी इल्यूमिनेटेड विंग ग्रिप हँडल (विंडो लाईनवर बसवलेले) देण्यात आले आहेत.
या SUV मध्ये 20-इंच ते 22-इंच आकाराचे अलॉय व्हील्स मिळतात. चांगल्या ट्रॅक्शनसाठी मागील चाकं थोडी रुंद ठेवण्यात आली आहेत. मागील बाजूला स्लिम LED टेल-लाइट्स, टेलगेटवर ब्लॅक स्ट्रिप, जाड ब्लॅक क्लॅडिंग आणि रियर बंपरवर पातळ सिल्व्हर स्ट्रिप देण्यात आली आहे.
भारतातील पहिला AI-Defined Two-Wheeler प्लॅटफॉर्म लाँच, देशातील ऑटो इंडस्ट्रीला मिळणार मोठी चालना
Volvo EX60 दोन एक्सटीरियर थीममध्ये उपलब्ध आहे — ब्राइट थीम आणि डार्क थीम.
ब्राइट थीममध्ये डोअर सिल्स आणि बंपर्सवर सिल्व्हर ॲक्सेंट दिले आहेत.
डार्क थीममध्ये एक्सटीरियरवर पूर्णपणे ब्लॅक फिनिश देण्यात आली आहे. या दोन्ही थीम वेगवेगळ्या स्टाइल प्रेफरन्स असलेल्या ग्राहकांसाठी देण्यात आल्या आहेत.
Volvo EX60 चा थेट मुकाबला BMW iX3 आणि Mercedes-Benz GLC EV सारख्या लक्झरी इलेक्ट्रिक SUV मॉडेल्सशी होणार आहे. कंपनीने अद्याप EX60 भारतात लाँच होणार की नाही याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, भारतात EX90 आणि ES90 EVs लाँच होण्याची शक्यता Volvo कडून व्यक्त करण्यात आली आहे.