ही ऑफर सोडू नका! डिसेंबर 2025 मध्ये Kia च्या Cars वर 3.65 लाखांपर्यंतचे Discount
ही मोहीम कियाच्या लोकप्रिय कार्सवर लागू असून, त्यामध्ये सेल्टोस, सोनेट, सिरॉस, कॅरेन्स क्लॅव्हिस (ICE/EV) आणि कार्निवल या मॉडेल्सचा समावेश आहे. अपग्रेड किंवा नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी या ऑफर्सद्वारे अधिक मूल्य, आधुनिक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाच्या सुरक्षिततेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
Tata Sierra चं नाणं खणखणीत वाजलं! फक्त 24 तासात मिळाली ‘तुफान’ बुकिंग
या मोहिमेबाबत प्रतिक्रिया देताना किया इंडियाचे सेल्स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्षअतुल सूद म्हणाले, “किया इंडियासाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे. ‘इन्स्पायरिंग डिसेंबर’ मोहिमेद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आहोत. कियाची डिझाइन उत्कृष्टता, तंत्रज्ञान आणि मालकीचा प्रीमियम अनुभव अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा उद्देश आहे. या मोहिमेमुळे आम्ही किया कुटुंबात नव्या ग्राहकांचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत, तसेच विद्यमान ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करत आहोत.”
किया इंडियाने या ऑफर्स काळजीपूर्वक डिझाइन केल्या असून, त्यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, लॉयल्टी बेनिफिट्स आणि कॉर्पोरेट ऑफर्स यांचा समावेश आहे. या सर्व डिस्काउंट निवडक मॉडेल्सवर उपलब्ध असतील.
Tata Sierra चं नाणं खणखणीत वाजलं! फक्त 24 तासात मिळाली ‘तुफान’ बुकिंग
ही ऑफर किया इंडियाच्या देशभरातील अधिकृत डीलर नेटवर्कद्वारे उपलब्ध असून, ती मर्यादित कालावधीसाठी, तसेच स्टॉक उपलब्धता आणि व्हेरिएंटनुसार लागू असेल. भविष्यासाठी सज्ज उत्पादन धोरण, प्रगत मोबिलिटी सोल्युशन्स, उत्कृष्ट सेवा दर्जा आणि दीर्घकालीन ग्राहक विश्वास यांवर भर देत किया इंडिया आपली बाजारातील उपस्थिती अधिक मजबूत करत आहे.






