फोटो सौजन्य: Pinterest
भारतीय ऑटो बाजारात टाटा पंचला आधीपासूनच चांगली मागणी मिळताना दिसते. 2021 मध्ये लाँच झालेली ही कार भारतीयांची एक आवडती कार ठरली आहे. आता टाटा मोटर्स याच कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. असा अंदाज आहे की येत्या काही वर्षात टाटा पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात लाँच केली जाऊ शकते.
Tata Sierra चं नाणं खणखणीत वाजलं! फक्त 24 तासात मिळाली ‘तुफान’ बुकिंग
नुकतेच, टाटा पंचचे फेसलिफ्ट व्हर्जन भारतात टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाले आहे. त्यामुळेच ग्राहक या कारबाबत अधिक उत्सुक दिसत आहे. चला जाणून घेऊयात, या कारच्या डिझाइनमध्ये कोणते बदल केले जाऊ शकतात.
स्प्लिट हेडलॅम्प सेटअप कायम ठेवण्यात येईल, मात्र त्याला कंपनीकडून अधिक आधुनिक लूक दिला जाऊ शकतो. Punch EV प्रमाणेच, नव्या पंचमध्ये हॅलोजनऐवजी LED लो-बीम आणि हाय-बीम युनिट्स देण्याची शक्यता आहे.
फ्रंट प्रोफाइलमध्ये नवीन अप्पर आणि लोअर ग्रिल मिळू शकतात, ज्यामध्ये आडव्या स्लॅट्सचा वापर केला जाईल. यासोबतच फ्रंट बंपरचे डिझाइनही नव्याने सादर केले जाण्याची शक्यता आहे.
नव्या पंचमध्ये नवीन 16-इंच अलॉय व्हील्स पाहायला मिळू शकतात. मागील बाजूस, टेल लॅम्प्स आणि बंपरच्या डिझाइनमध्ये किरकोळ पण लक्षवेधी बदल केले जाऊ शकतात.
एक्सटीरियरप्रमाणेच कारच्या इंटिरियरमध्येही मोठे बदल अपेक्षित आहेत. फेसलिफ्ट पंचमध्ये टाटा लोगो असलेले नवीन टू-स्पोक फ्लॅट-बॉटम स्टीयरिंग व्हील दिले जाऊ शकते. कारमध्ये जुन्या 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी व्हेंटिलेटेड सीट्स, तर सुरक्षिततेसाठी 360-डिग्री कॅमेरा आणि ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग सिस्टम देण्यात येऊ शकते.
नव्या पंचमध्ये इंजिन पर्यायांमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. ही कार पूर्वीप्रमाणेच 1.2-लीटर रेव्होट्रॉन पेट्रोल आणि पेट्रोल-सीएनजी (बाय-फ्यूल) व्हेरिएंटमध्ये उपलब्ध राहील. पेट्रोल इंजिन 64.6 kW (87 hp) पॉवर आणि 115 Nm टॉर्क जनरेट करते, तर सीएनजी मोडमध्ये ही क्षमता 54 kW (72 hp) पॉवर आणि 103 Nm टॉर्कपर्यंत कमी होते. याशिवाय, कंपनी सीएनजी व्हेरिएंटसाठी 5-स्पीड AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) चा पर्याय देऊ शकते.






