Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगभरात विकली जाणारी प्रत्येक चौथी कार इलेक्ट्रिक! या देशांमध्ये सर्वात जास्त डिमांड

जगभरातल्या रस्त्यांवर इलेक्ट्रिक कार आता फक्त भविष्यच नाही तर वर्तमान बनत चालल्या आहेत. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या लेटेस्ट रिपोर्ट नुसार, जगभरात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीची संख्या 2 करोडच्या पुढे गेली आहे. विशेष म्हणजे 2025 मध्ये जगात विकली जाणारी प्रत्येक चौथी कार ही इलेक्ट्रिक आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: May 27, 2026 | 06:25 PM
जगभरात विकली जाणारी प्रत्येक चौथी कार इलेक्ट्रिक! या देशांमध्ये सर्वात जास्त डिमांड
Follow Us
Follow Us:

जगभरात इलेक्ट्रिक कार वापरण्यावर बराच जोर दिला जात आहे. याचा परिणाम पण तसाच समोर येत आहे.  २०२५ मध्ये मोठ्या संख्येने लोकांनी इलेक्ट्रिक गाड्या खरेदी केल्या आहेत. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या ग्लोबल ईवी आउटलुक 2026 च्या मते ही विक्री २०२५ सालच्या २० टक्क्यांनी वाढली आहे.

२०२५ मध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्रीने २ करोडचा आकडा पार केलं आहे. जगभरात विकल्या जाणाऱ्या सगळ्या कारमध्ये २५ टक्के इलेक्ट्रिक कार आहेत.  याचा हाही अर्थ आहे कि जगभरात विकल्या जाणारी प्रत्येक चौथी कार ही इलेक्ट्रिक आहे. हे जागतिक ऑटोमोबाइल इंडस्ट्रीचं मोठ यश म्हणाव लागेल.

इलेक्ट्रिक कार चालवताना बॅटरी आपोआप होणार चार्ज? काय आहे ‘हे’ जादुई फिचर?

बॅटरी EV आणि प्लग-इन EV दोन्हींचा आहे समावेश

काही वर्षांपूर्वी पर्यंत इलेक्ट्रिक कार हे मोजक्या लोकांचं साधन आहे असं समजलं जायचं. पण आता या कार मुख्य प्रवाहात आल्या आहेत आणि यांच्या दमदार अस्तित्त्वाला नाकारलं जाऊ शकत नाही. तरीही इलेक्ट्रिक कारच्या मागण्या प्रत्येक मार्केटमध्ये सारख्या नाहीयेत. काही मार्केट मध्ये याला चांगली मागणी आहे; तर काही मार्केटमध्ये आताच याची सुरुवात झाली आहे.

इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या ग्लोबल ईवी आउटलुक 2026 मध्ये ज्या 25 टक्के डेटाची गोष्ट केली आहे, त्यात बॅटरी एलेक्ट्रीकॅल व्हेईकल आणि प्लग-इन हाईब्रीड व्हेईकल हे दोन्हीही समाविष्ट आहेत. 2025 मध्ये झालेल्या  एकूण इलेक्ट्रिक कारच्या विक्रीमध्ये 65 टक्के इलेक्ट्रिक व्हेईकल आहे. म्हणजे ज्यांना चार्ज करून वापरता येते असे. याच्या शिवाय 35 टक्क्यांमध्ये रेंज एक्टेंडर आणि प्लग-इन हाइब्रिड दोन्ही समाविष्ट आहेत.

महागड्या इंधनापासून सुटका हवी? ‘या’ ५ इलेक्ट्रिक गाड्या पहा; कमी खर्चात देतात जबरदस्त मायलेज

सगळ्यात जास्त कोणत्या देशात विकल्या जात आहेत इलेक्ट्रिक कार

2025 मध्ये इलेक्ट्रिक व्हेईकल विक्रीमध्ये नॉर्वे देश सगळ्यात अव्वल आहे. या देशात विकल्या जाणार्या नवीन कार गाड्यांमध्ये 97 टक्के इलेक्ट्रिक आहेत. याच्या शिवाय डेनमार्क, स्वीडन, चीन आणि युनायटेड किंगडम असे देश आहेत, जिथे अर्ध्याहून जास्त विकल्या जाणार्या कार इलेक्ट्रिक आहेत. या देशांमध्ये इलेक्ट्रिक कारच्या विक्री अनुक्रमे 71%, 61%, 53% आणि 55% इतकी आहे.

भारताच्या मार्केटकडे पाहायला गेलं तर, इकडे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री टू-व्हीलर आणि थ्री-व्हीलर मार्केट मध्ये झालीय. भारत 2025 मध्ये जगातला सर्वात मोठा इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केट राहिला होता. 2025 मध्ये देशात जवळजवळ 13 करोड इलेक्ट्रिक टू व्हीलर विकल्या गेल्यात. तिथेच थ्री व्हीलरच्या विक्रीमध्येही भारत मोठ्या मार्केट मधून एक आहे.

Web Title: Electric cars demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • automobile news
  • electric bike
  • electric car

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.