
फोटो सौजन्य: @cars_pixels/ X.com
व्होल्वोची ही कार अनेक अर्थांनी खास ठरणार आहे, कारण Google चा अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टम ‘Gemini AI’ असणारी ही Volvo ची पहिलीच इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. EX60 खास करून त्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आली आहे, जे त्यांच्या ड्रीम कारमध्ये लक्झरी, सेफ्टी आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी यांचा परिपूर्ण कॉम्बिनेशन शोधत आहेत. लाँचनंतर ही SUV Volvo च्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये EX40 आणि EX90 यांच्या मधोमध स्थान घेईल.
काय सांगता! चक्क Tesla Cars वर मिळतंय डिस्काउंट, कोणता मॉडेल झाला स्वस्त? जाणून घ्या
Volvo EX60 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये देण्यात आलेले Google Gemini AI. हे एक अत्यंत स्मार्ट AI असिस्टंट असून, त्याद्वारे चालक कारशी अगदी नैसर्गिक भाषेत संवाद साधू शकतो. ठरावीक व्हॉइस कमांड्स लक्षात ठेवण्याची गरज नाही. तुम्ही सहजपणे “एखादा पत्ता शोध”, “रोड ट्रिप प्लॅन कर”, “हे सामान बूट स्पेसमध्ये मावेल का सांग” किंवा “एखाद्या नवीन कल्पनेवर विचार कर” असे सांगू शकता. हे संपूर्ण सिस्टम कारमध्ये पूर्णपणे इंटिग्रेट केलेले असल्याने चालकाचे लक्ष रस्त्यावरच राहते आणि ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित व आरामदायक बनते.
Tata Punch Facelift चा कोणता व्हेरिएंट तुमच्यासाठी पैसा वसूल, खरेदी करण्याआधी जाणून घ्या ‘ही’ गोष्ट
Volvo च्या माहितीनुसार, EX60 एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 810 किमीपर्यंत WLTP रेंज देऊ शकते, ज्यामुळे ती आजपर्यंतची सर्वाधिक रेंज देणारी Volvo इलेक्ट्रिक कार ठरणार आहे. ही SUV ऑल-व्हील ड्राइव्ह (AWD) सिस्टमसह येणार आहे.
यामध्ये 400 किलोवॅटपर्यंत अल्ट्रा-फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार असून, केवळ 10 मिनिटांत सुमारे 340 किमीची रेंज मिळू शकते. याशिवाय, यात Breathe Battery Technologies यांच्या सहकार्याने विकसित केलेला स्मार्ट बॅटरी अल्गोरिदम देण्यात आला आहे, ज्यामुळे बॅटरीची कामगिरी आणि लाइफ दोन्ही अधिक चांगले राहतील.