फोटो सौजन्य: @MotorOctane/X.com
देशात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत. अशीच एक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. या देशातील प्रमुख वाहन कंपन्यांमध्ये समाविष्ट कंपनीने अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर केल्या आहेत. तसेच ग्राहक सुद्धा कार खरेदी करताना पहिले प्राधान्य मारुतीच्या कारलाच देत असतात.
कंपनीने कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये Maruti Fronxच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायाची ऑफर दिली आहे. जर तुम्हीही या SUVच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटची खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर दर महिन्याला किती रुपये EMI देऊन ही कार घरी आणता येईल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Royal Enfield च्या बाईक घरी आणायच्या तयारीत? GST कमी झाल्याने ‘या’ बाईक्स झाल्या सर्वात स्वस्त
मारुतीकडून फ्रॉन्क्सच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटला 8.15 लाख रुपये एक्स-शोरूम किंमतीवर ऑफर केले जाते. राजधानी दिल्लीमध्ये खरेदी केल्यास ऑन-रोड किंमत सुमारे 9.14 लाख रुपये होते. यामध्ये 8.15 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत, सुमारे 57 हजार रुपये RTO आणि 43 हजार रुपये इन्शुरन्स यांचा समावेश आहे.
जर तुम्ही Maruti Fronxच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून एक्स-शोरूम किंमतीवरच फायनान्स केला जाईल. या परिस्थितीत 2 लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 7.15 लाख रुपये बँकेकडून फायनान्स करावे लागतील. बँकेकडून 9% व्याजदर आणि 7 वर्षांच्या कालावधीसाठी 7.15 लाख रुपये कर्ज दिल्यास, दर महिन्याला फक्त 11499 रुपयांचा EMI पुढील सात वर्षांसाठी भरावा लागेल.
जर तुम्ही 9% व्याजदर आणि 7 वर्षांसाठी 7.15 लाख रुपये कार लोन घेतले, तर दर महिन्याला 11499 रुपये EMI भरणे महत्वाचे असेल. सात वर्षांत सुमारे 2.51 लाख रुपये फक्त व्याज म्हणून भरावे लागेल. यानंतर Fronx ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची एकूण किंमत अंदाजे 11.65 लाख रुपये होईल.
Maruti Suzuki ने Fronx कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये आणली आहे. या सेगमेंटमध्ये त्याची थेट स्पर्धा Maruti Brezza, Kia Sonet, Kia Syros, Hyundai Venue, Mahindra XUV 3XO यांसारख्या SUV सोबत होतो. याशिवाय, किंमतीच्या बाबतीत काही हॅचबॅक कार्सकडूनही स्पर्धा आहे.