
उपलब्ध वास्तविक वापराच्या डेटानुसार चांगल्या परिस्थितीत EV बॅटरी 15 ते 20 वर्षे किंवा त्याहून जास्त काळ वापरण्यायोग्य राहू शकते. Geotabच्या नव्या अभ्यासात 22,700 पेक्षा जास्त इलेक्ट्रिक वाहनांचा डेटा तपासण्यात आला. त्यात सरासरी वार्षिक बॅटरी degradation 2.3% आढळले. याचा अर्थ बॅटरी जुनी झाली तरी ति अचानक संपत नाही; ती हळूहळू कमी होत जाते.
बॅटरीचे आयुष्य वाढवण्यासाठी कंपन्या सर्वात महत्त्वाचे काम Battery Management System वर करत आहेत. हे सॉफ्टवेअर बॅटरीचे तापमान, चार्जिंग आणि डिस्चार्जिंग नियंत्रित करते. त्यासोबतच liquid cooling सारख्या thermal-management तंत्रज्ञानामुळे बॅटरीला अत्याधिक उष्णतेपासून वाचवले जाते. कारण जास्त तापमान आणि वारंवार होणारे अत्यंत जलद charging बॅटरीच्या degradation ला वेग देऊ शकते.
चार्जिंगची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. रोजच्या वापरासाठी बॅटरीला सतत 100% पर्यंत भरून ठेवण्यापेक्षा मध्यम charge range वापरणे जास्त फायदेशीर ठरू शकते. त्याचप्रमाणे DC fast charging चा सतत वापर टाळल्यास बॅटरीवरील thermal stress कमी होण्यास मदत होते.
अॅमेझॉनवर १५००W फॅट-टायर ई-बाईक अवघ्या ४५,००० रुपयांमध्ये मध्ये उपलब्ध! जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हणून 20 वर्षे हा आकडा अशक्य नाही; पण तो प्रत्येक EV साठी हमखास मिळेल असेही म्हणता येणार नाही. बॅटरीची chemistry, हवामान, charging habits आणि वाहनाचा वापर यावर तिचे वास्तविक आयुष्य ठरते. महत्त्वाचे म्हणजे आधुनिक EV बॅटरी “काही वर्षांत संपणारा पार्ट” नसून long time वापरण्यासाठी विकसित केली जात आहे.