Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Electric Car Servicing: सर्व्हिसिंगचा खर्च पाहून डोकं फिरलं! पठ्ठ्याने घरीच दुरुस्त केली EV कारची बॅटरी

Electric Car Servicing: इलेक्ट्रिक कारच्या बॅटरीशी संबंधित दुरुस्तीचा खर्च मोठा असू शकतो. अशाच एका प्रकरणात एका इंजिनीअरिंग विद्यार्थ्याने सर्व्हिस सेंटरमध्ये मोठा खर्च सांगितल्यानंतर स्वतः कारच्या बॅटरी सिस्टीमची तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 24, 2026 | 11:53 AM
Electric Car Servicing: सर्व्हिसिंगचा खर्च पाहून डोकं फिरलं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Electric Car Servicing: सर्व्हिसिंगचा खर्च पाहून डोकं फिरलं! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

EV Car Battery Repair Viral Video : सध्या वाढत्या पेट्रोलच्या किंमती पाहता अनेकजण इलेक्ट्रिक कारचा पर्याय निवडतात. इलेक्ट्रिक गाडीमुळे प्रदूषण कमी होते तसेच कमी खर्चात जास्तीत प्रवास मिळतो . त्यामुळे इलेक्ट्रिक कार नागरिकांची पाहिली पसंती असते. दरम्यान या गाड्यांमध्ये काही तांत्रिक अडचण आली की, खर्च मात्र  वाढतो. मुख्य म्हणजे, बॅटरी खराब झाल्यावर मालकांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. अशाच एका प्रकरणाचा व्हिडिओ सध्या सोशलमीडियावर व्हायरल होत आहे. Electric Car Servicing

नेमंक काय घडलं?

एका इंजिनीअरिंग विद्यार्थी आपली गाडीमध्ये तांत्रिक अडचण आल्यानंतर तो सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन गेला. तिथे बॅटरीशी संबंधित कामासाठी मोठा खर्च सांगण्यात आले. एवढेच नाही तर काही आवश्यक भाग मिळण्यासाठी काही दिवस थांबावे लागू शकते, असेही त्याला सांगण्यात आले. त्याने लगेच दुसरा मार्ग निवडला. स्वतः समस्या समजून घेण्याचे त्याने ठरवले.

तांत्रिक माहितीचा आधार घेत त्याने कारच्या बॅटरी सिस्टीमची तपासणी केली आणि बिघाड नेमका कुठे? आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला. तसेच तो रिपेंर करत असताना त्याने शूट देखील केले. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी कारच्या बॅटरी भागावर काम करताना दिसतोय. वाहनातील संबंधित भाग उघडून बॅटरी पॅकमध्ये तपासणी केली. त्यानंतर दोष शोधून त्यावर काम करण्यात आले आणि जवळपास दोन दिवसांत कार पुन्हा सुरू झाल्याचा दावा केला जात आहे.

E- Bike Accessories: ई-बाईक रायडर्ससाठी हे ७ गॅजेट्स ठरतील अत्यंत उपयुक्त; पाहा युझर्सनी पसंत केलेल्या टॉप अ‍ॅक्सेसरीज!

घटनेची दुसरी बाजू

या घटनेची दुसरी बाजूही महत्त्वाची आहे. इलेक्ट्रिक कारची मुख्य बॅटरी ही साध्या कारमध्ये असलेल्या 12V बॅटरीसारखी नसते. EVमध्ये मोठ्या क्षमतेची बॅटरी असते आणि तिच्यात अत्यंत जास्त व्होल्टेज असू शकते. म्हणूनच सोशल मीडियावरील व्हिडीओ पाहून कोणत्याही सामान्य कार मालकाने स्वतः बॅटरी उघडणे योग्य नाही.

चुकीची पद्धत वापरल्यास विजेचा धक्का, स्पार्क, आग किंवा बॅटरीचे गंभीर नुकसान होऊ शकते. अशा कामासाठी विशेष साधने, योग्य सुरक्षा पद्धती आणि उच्च-व्होल्टेज सिस्टीमचे प्रशिक्षण आवश्यक असते. त्यामुळे तांत्रिक माहिती आहे म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या कारवर असा प्रयोग करावा, असा अर्थ या व्हिडीओतून घेणे धोकादायक ठरू शकते.

Skoda New 5 & 7 Seater SUVs: स्कोडाची भारतात मोठी घोषणा; लवकरच लाँच करणार २ मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक एसयूव्ही!

व्हिडीओतील दाव्यांची पूर्ण खात्री नाही

या प्रकरणाची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हायरल पोस्टमधील प्रत्येक दावा अद्याप स्वतंत्रपणे सिद्ध झालेला नाही. कारचे नेमके मॉडेल, बॅटरीमध्ये कोणती समस्या होती, सर्व्हिस सेंटरने किती खर्च सांगितला आणि विद्यार्थ्याला प्रत्यक्षात किती खर्च आला, याबाबत ठोस अधिकृत माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे हा व्हिडीओ पाहून EVची बॅटरी सहज आणि स्वस्तात दुरुस्त करता येते, असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. मात्र, या घटनेमुळे इलेक्ट्रिक कारच्या देखभालीचा खर्च, बॅटरी रिपेअरची पद्धत आणि भविष्यात ग्राहकांना मिळणाऱ्या दुरुस्तीच्या पर्यायांवर नक्कीच चर्चा सुरू झाली आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Ev car battery repair engineering student fixes battery issue himself video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
1

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
2

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा
3

Lifestyle News: सिगारेट ओढता? मग रक्तवाहिन्यांवरही होऊ शकतो ‘हा’ मोठा परिणाम; तज्ज्ञांचा इशारा

World Sight Day 2026 : स्क्रीन टाईम कमी करा, डोळ्यांचे आरोग्य जपा, यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते
4

World Sight Day 2026 : स्क्रीन टाईम कमी करा, डोळ्यांचे आरोग्य जपा, यामुळे डोळ्यांचे आरोग्य जपण्यास मदत होऊ शकते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.