Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nana Patekar Funeral Pune Donje: नाना पाटेकर यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Nana Patekar Funeral Pune Donje: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन झाल्याचे बातमीत नमूद करण्यात आले आहे. गोव्यातील त्यांच्या घरी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर डॉक्टरांनी सुमारे 45 मिनिटे CPR करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात यश आले नाही.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 09, 2026 | 01:06 AM
Nana Patekar Funeral Pune Donje (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Nana Patekar Funeral Pune Donje (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नाना पाटेकर यांचे वयाच्या 75व्या वर्षी निधन.
  • डोणजे येथील 27 एकरांच्या फार्महाऊसवर अंत्यसंस्कार.
  • महाराष्ट्र शासनाच्या वतीने नानांना मानवंदना देण्यात आली.
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. आज सकाळी गोव्यातील घरामध्ये त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. वयाच्या 75 वर्षी नानांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटे CPR करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही.निधनानंतर त्यांचे पार्थिव गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पोस्टमॉर्टेमसाठी नेण्यात आले होते. कायदेशीर प्रक्रिया असल्याने ती करावी लागेल. दुपारी अडीच वाजता ही प्रक्रिया सुरू झाली. त्यांचा मुलगा मल्हारला पुण्यावरुन गोव्याला पोहोचयाला वेळ लागल्याने ही प्रक्रिया थोडी लांबली होती. Nana Patekar Funeral Pune Donje:

आजच होणार अंत्यसंस्कार

सुरुवातीला अंत्यसंस्कार आज होणार की उद्या याबाबत संभ्रम होता. पण आता त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. त्यांचे निकटवर्तीय अॅड. स्वप्नील प्रभू आजगावकर यांनी मल्हार पाटेकर यांच्याशी बोलून सांगितले की, नानांवर आजच म्हणजे गुरुवारीच अंत्यसंस्कार केले जातील. पोस्टमॉर्टेम दुपारी साडेतीन वाजेपर्यंत पूर्ण होईल.

त्यानंतर अर्धा तास त्यांचे पार्थिव गोव्यातील हॉस्पिटलमध्येच लोकांच्या शेवटच्या दर्शनासाठी ठेवले जाईल. तिथून त्यांचे पार्थिव थेट मोपा विमानतळावर नेले जाईल.विशेष विमानाने आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणले जाईल. तिथून सिंहगड रोड मार्गे त्यांना खडकवासला जवळील त्यांच्या डोणजे येथील फार्महाऊसवर नेले. नानांची इच्छा होती की त्यांचा अंतिम विधी त्यांच्याच 27 एकरच्या फार्महाऊसवर व्हावा आणि त्यानुसारच तयारी सुरू होती. पुण्यात संध्याकाळी ट्रॅफिक आणि गर्दीचा विचार करता रात्री पूर्ण शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

सिंहगड रस्त्यावर वाहतुकीचे मोठे आव्हान

संध्याकाळी सिंहगड रस्त्यावर खूप ट्रॅफिक असतो. त्यात आज मुख्यमंत्री, मोठे राजकीय नेते आणि चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार उपस्थितीत होते. त्यांच्या गाड्यांमुळे रस्त्यावर आणखी गर्दी झाल्याने पुणे शहर आणि ग्रामीण वाहतूक पोलिसांनी आधीच तयारी केली. गर्दी होऊ नये म्हणून त्यांनी एक वेगळा कॉरिडॉर तसेच पर्यायी रस्त्यांचे पण प्लॅनिंग केले होते.

Mary Kom: Ex पतीविरोधात गंभीर आरोप करणं पडलं महागात, पती ओनलरने दाखल केला मानहानीचा खटला

डोणजे फार्महाऊसवर तयारी सुरू

डोणजे येथील फार्महाऊसवर सध्या युद्धपातळीवर काम सुरू होते. PWD आणि स्थानिक प्रशासन तिथे अंत्यदर्शनासाठी जागा बनवली. चाहत्यांची मोठी गर्दी आल्याने ग्नामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्यावतीने पोलीस दलाकडून नानांना मानवंदना दिली.

Web Title: Nana patekar death last rites donje farmhouse pune rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2026 | 11:30 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News
  • Nana Patekar

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा
1

Nana Patekar Death: नाना पाटेकरांच्या आठवणी सांगताना प्रताप सरनाईकांना अश्रू अनावर; ‘अंकुश’ चित्रपटाचा सांगितला खास किस्सा

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
2

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही
3

M1xchange Maharashtra: महाराष्ट्रातील छोट्या उद्योगांसाठी खुशखबर, आता पैशांची अडचण होणार नाही

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप
4

Nana Patekar: नाना पाटेकरांच्या शेवटच्या फोन कॉलची हृदयस्पर्शी आठवण; ‘लव यु बाळा’ म्हणत निरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.