फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रात अनेक वाहन निर्मात्याउया कंपनीज विविध कार्स लाँच करत आहे. या कार्सन भारतीय ग्राहकांकडून सुद्धा चांगली पसंती मिळत आहे. अनेक कार कंपनीज सध्या इलेक्ट्रिक कार्स बनवण्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करत आहे. एकीकडे नवनवीन वाहनं मार्केटमध्ये लाँच होत असतानाच दुसरीकडे गेल्याच महिन्यात म्हणजेच ऑगस्ट 2024 मध्ये वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून आले आहे.
ऑगस्ट 2024 मध्ये देशभरातील वाहनांच्या विक्रीत मासिक आधारावर घट झाली असल्याचे समोर आले आहे. FADA ने जारी केलेल्या अहवालानुसार देशभरात कोणत्या विभागात किती वाहनांची विक्री झाली आहे, ते आपण पुढे सविस्तर जाणून घेणार आहोत.
FADA ने सादर केलेल्या अहवालानुसार, ऑगस्ट 2024 मध्ये देशभरात एकूण 18,91,499 वाहनांची विक्री झाली आहे. ज्यामध्ये दुचाकी, तीन चाकी, खाजगी वाहने, व्यावसायिक वाहने तसेच ट्रॅक्टरचा समावेश आहे. या अहवालानुसार, घसरणीनंतरही सर्वाधिक विक्री दुचाकी विभागात पाहायला मिळाली आहे. त्यानंतर खासगी वाहनांची विक्री सर्वाधिक झाली आहे.
फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, देशभरात 13,38,237 दुचाकी वाहनांची विक्री झाली आहे. त्यानंतर खासगी वाहनांची विक्री 309053 इतकी झाली. ऑगस्ट 2024 मध्ये तीनचाकी विभागात एकूण 105478 वाहनांची विक्री असून गेल्या महिन्यात 73253 व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. मागील महिन्यात ट्रॅक्टर विभागात 65478 युनिट्सची विक्री झाली आहे.
FADA अहवालानुसार, मासिक आधारावर विक्रीत सात टक्क्यांहून अधिक घट झाल्याचे समोर आले आहे. परंतु याचवेळी वर्षानुवर्षे सुमारे तीन टक्क्याची वाढ नोंदवली गेली आहे. मासिक आधारावर सर्वात मोठी घसरण ट्रॅक्टर विभागात झाली आहे. माहितीनुसार, या विभागात 18.12 टक्के घट झाली आहे. त्यापाठोपाठ व्यावसायिक वाहनांची विक्री 8.50 टक्क्यांनी घसरली आहे. तर दुचाकी विभाग 7.29 टक्क्यांच्या घसरणीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. यानंतर, तीन चाकी वाहन विभागात आणि नंतर प्रवासी वाहन विभागात थोडीशी घट पाहायला मिळत आहे.
गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात देशभरात एकूण 1838501 वाहनांची विक्री झाली होती. वार्षिक आधारावर या वर्षी ऑगस्ट महिन्यात 2.88 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर गेल्या वर्षी दुचाकी विभागात 12,59,140 युनिट्सची विक्री झाली होती. प्रवासी वाहन विभागात 3,23,720 युनिट्स, तीन-चाकी वाहन विभागात 1,03,782, व्यावसायिक विभागात 77967 आणि ट्रॅक्टर विभागात 73892 युनिट्सची विक्री झाली होती.