फोटो सौजन्य: YouTube
सध्या भारतात अनेक कार्स लाँच करत आहे. या कार्सना भारतीय ग्राहकांकडून सुद्धा चांगली मागणी मिळत आहे. अनेक कार उत्पादक कंपनीज भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच निरनिराळ्या कार्स भारतीय मार्केटमध्ये आणत असतात. तर काही कंपनीज आपल्या कासचे नवीन व्हर्जन्स मार्केटमध्ये लाँच आर्त असतात.
मारुती सुझुकी ही भारतातील एक मोठी कार उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांच्या अपेक्षेनुसार कार्स मार्केटमध्ये लाँच करत असते. अनके जण आजही नवीन कार खरेदी करायची असल्यास मारुती सुझुकीला पहिले प्राधान्य देत असतात. कंपनीची स्विफ्ट कार ही भारतीय मार्केटमध्ये चांगलीच लोकप्रिय झाली होती.
हे देखील वाचा: आठवडाभर कार एकाच ठिकाणी उभी राहिल्यावर डॅमेज होऊ शकतात ‘हे’ पार्टस, जाणून घ्या
मारुतीने नवीन जनरेशनची मारुती स्विफ्ट मे 2024 मध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच केली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी आता लवकरच त्याचे CNG व्हेरियंट लाँच करू शकते. मारुती स्विफ्ट सीएनजी कधी सुरू होणार? त्याची किंमत पेट्रोलच्या तुलनेत किती असू शकते? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण या बातमीत जाणून घेणार आहोत.
मारुतीकडून हॅचबॅक सेगमेंटमध्ये देण्यात येणारी नवीन जनरेशन स्विफ्ट सीएनजीसह आणण्याची तयारी सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच याला लाँच करू शकते.
रिपोर्ट्सनुसार, कंपनी मारुती स्विफ्ट सीएनजीमध्ये फक्त नवीन Z सीरीज इंजिन देईल. या तीन सिलेंडर इंजिनची क्षमता 1.2 लीटर असेल. हे इंजिन सीएनजी मोडमध्ये 69 पीएस पॉवर आणि सुमारे 97 न्यूटन मीटरचा टॉर्क देऊ शकते.
हे देखील वाचा: Car Servicing च्या नावाखाली अशाप्रकारे मूर्ख बनवतात कार कंपनीज, वेळीच राहा जाणकार
मारुतीने नवीन जनरेशनच्या स्विफ्टमध्ये दिलेले फीचर्स, या सीएनजी प्रकारांमध्येही दिले जातील. ABS, EBD सोबत, सहा एअरबॅग ऑफर केल्या जातील. याशिवाय वायरलेस ॲपल कार प्ले, अँड्रॉइड ऑटो, 17.78 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टीम, डिजिटल एसी सारखे फीचर्स यामध्ये देण्यात येणार आहेत.
स्विफ्ट सीएनजी लाँच करण्याबाबत कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही नवीन कार 12 सप्टेंबरला लाँच केली जाऊ शकते.
मारुतीकडून स्विफ्ट सीएनजी एकापेक्षा जास्त व्हेरियंतमध्ये आणली जाऊ शकते. अशा परिस्थितीत त्याची संभाव्य किंमत पेट्रोल व्हेरियंटपेक्षा 70 ते 90 हजार रुपयांनी जास्त असू शकते. स्विफ्टची नवीन जनरेशन मारुतीने 6.49 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत ऑफर केली आहे.