
भारतातील सर्वांत मोठी व्हॅन उत्पादक आणि शेअर्ड तसेच विशेष मोबिलिटी सोल्यूशन्स क्षेत्रातील अग्रणी कंपनी ‘फोर्स मोटर्स लिमिटेड’ने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीचे आणि पहिल्या सहामाहीचे मजबूत आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. नवीन ‘ट्रॅव्हलर एन’ रेंज आणि ‘अर्बनिया डिलक्स’ यांच्या यशस्वी सादरीकरणानंतर मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे कंपनीने वाहन विक्रीत प्रबळ गती मिळवली आहे.
वित्तीय कामगिरीचा विचार करता, वित्त वर्ष २०२७ च्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने २,९६७ कोटी रुपयांचा महसूल नोंदवला, जो गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ४१% अधिक आहे. या तिमाहीत कंपनीचा एबिटडा २३% ने वाढून ४७६ कोटी रुपये आणि कर-पूर्व नफा २४% ने वाढून ३९३ कोटी रुपये झाला आहे. तर कर-पश्चात नफा २९१ कोटी रुपये नोंदवला गेला आहे.
वित्त वर्ष २०२७ च्या पहिल्या सहामाहीत कंपनीने एकूण महसूल ५,४४५ कोटी रुपये नोंदवला, जो गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत २३% अधिक आहे. पहिल्या सहामाहीत कंपनीचा एबिटडा १३% वाढून ८४२ कोटी रुपये आणि कर-पूर्व नफा १३% वाढून ६८२ कोटी रुपये झाला आहे. या सहामाहीत कर-पश्चात नफा ५०४ कोटी रुपये नोंदवला गेला आहे. पहिल्या सहामाहीत कंपनीच्या एकूण वाहनांच्या विक्रीत २३% ची वाढ झाली आहे.
किया इंडियाच्या AO27 बॉलकिड्स ट्रायल्स पूर्ण! ऑस्ट्रेलियन ओपन 2027 मध्ये करणार देशाचे प्रतिनिधित्व
कंपनीच्या कामगिरीवर भाष्य करताना *फोर्स मोटर्स लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसन फिरोदिया म्हणाले, “वित्त वर्ष २०२६-२७ ची पहिली सहामाही फोर्स मोटर्ससाठी बदलाची आणि पुन्हा गती मिळवण्याची ठरली आहे. नवीन ट्रॅव्हलर एन रेंज आणि अर्बनिया डिलक्सचे सादरीकरण हे आमच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओला अधिक बळकट करणारे पाऊल होते. ऑपरेशन्समध्ये आवश्यक फेरबदल केल्यानंतर आमच्या सक्षम टीम्सच्या प्रयत्नांमुळे आम्ही पुन्हा वेग पकडू शकलो आणि गेल्या दोन महिन्यांत विक्रीत मोठी वाढ झाली आहे.”
फिरोदिया पुढे म्हणाले, “आम्ही दीर्घकालीन दृष्टिकोनातून जवळपास ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. या गुंतवणुकीमुळे आमची उत्पादन क्षमता दुप्पट होऊन जवळपास ८०,००० वाहनांपर्यंत पोहोचेल. यासोबतच लवकरच लाँच होणाऱ्या ‘ट्रॅव्हलर ईव्ही‘ रेंजच्या माध्यमातून आम्ही इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात आमची पकड अधिक मजबूत करणार आहोत.”
कर्जमुक्त ताळेबंद, ‘प्रोजेक्ट डिजीफोर्स’द्वारे सुरू असलेले डिजिटल सक्षमीकरण आणि ग्राहकांकडून मिळणारा मजबूत प्रतिसाद याच्या जोरावर फोर्स मोटर्स आगामी सणासुदीच्या काळात आणि दुसऱ्या सहामाहीत आपल्या वाढीचा हा वेग असाच कायम ठेवण्यास सज्ज आहे.
मारुती सुझुकीच्या SUV विक्रीत 56% वाढ! फ्रॉन्क्सची बाजी, व्हिक्टोरिसनेही मारली मोठी झेप
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: फोर्स मोटर्सचा आर्थिक वर्ष 2027 च्या दुसऱ्या तिमाहीतील महसूल किती होता?
उत्तर: कंपनीने 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत 2,967 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. मागच्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत ही 41% वाढ आहे.
प्रश्न 2: फोर्स मोटर्सचा दुसऱ्या तिमाहीतील कर-पश्चात नफा किती होता?
उत्तर: कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 291 कोटी रुपयांचा कर-पश्चात नफा नोंदवला. पहिल्या सहामाहीत हा आकडा 504 कोटी रुपये होता.
प्रश्न 3: फोर्स मोटर्स भविष्यात कोणत्या मोठ्या योजना राबवणार आहे?
उत्तर: कंपनी जवळपास 3,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करून प्रोडक्शन कॅपसिटी दुप्पट करत 80,000 वाहनांपर्यंत नेण्याची योजना आखत आहे. तसेच ट्रॅव्हलर ईव्ही रेंज सादर करून इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात विस्तार करण्याचे उद्दिष्ट आहे.