Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ford Explorer आणि Lincoln Aviator ड्रायव्हर सीटमध्ये तांत्रिक बिघाड! कंपनीकडून हजारो गाड्या मागे मागवल्या!

फोर्ड आणि लिंकन कंपनीने 'एक्सप्लोरर' व 'एव्हिएटर' या SUV मॉडेल्सच्या जवळपास ८०,००० गाड्या परत मागवल्या आहेत. ड्रायव्हरची सीट कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आपोआप पूर्णपणे मागे झुकत असल्याने मागे बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 30, 2026 | 11:30 AM
Ford Explorer आणि Lincoln Aviator ड्रायव्हर सीटमध्ये तांत्रिक बिघाड! कंपनीकडून हजारो गाड्या मागे मागवल्या!
Follow Us
Follow Us:
  • गाड्या परत मागवल्या: फोर्डने तांत्रिक बिघाडामुळे जवळपास ८०,००० एक्सप्लोरर आणि लिंकन एव्हिएटर गाड्या रिकॉल केल्या.
  • सीटची तांत्रिक अडचण: ड्रायव्हरची सीट अचानक आणि न सांगता पूर्णपणे मागे झुकत असल्याचे समोर आले.
  • सुरक्षेचा धोका: सीट मागे ढकलल्याने मागच्या रांगेत बसलेल्या प्रवाशांना दुखापत होण्याचा मोठा धोका आहे.

फोर्ड आणि तिची उपकंपनी असणाऱ्या लिंकनने आपल्या जवळपास ८०,००० गाड्यांसाठी नवीन सेफ्टी रिकॉल जाहीर केला आहे. यामध्ये तीन-रो असणाऱ्या ‘फोर्ड एक्सप्लोरर’ आणि ‘लिंकन एव्हिएटर’ या प्रसिद्ध SUV मॉडेल्सचा समावेश आहे. या गाड्यांमध्ये ड्रायव्हरची सीट अचानक आणि कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय पूर्णपणे मागे झुकत असल्याचे समोर आले आहे.

कोणत्या आणि किती गाड्यांवर झाला परिणाम?

अमेरिकन सुरक्षा संस्था NHTSA नुसार एकूण ७९,५७९ गाड्यांमध्ये ही तांत्रिक अडचण असण्याची शक्यता आहे:

  • २०२६ – २०२७ फोर्ड एक्सप्लोरर: ६४,४०९ युनिट्स
  • २०२६ – २०२७ लिंकन एव्हिएटर: १५,१७० युनिट्स
Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक

नक्की समस्या काय आहे?

फोर्डने दिलेल्या माहितीनुसार, ही समस्या ड्रायव्हर सीटच्या बॅकफ्रेम स्ट्रक्चर आणि त्यातील रिक्लायनिंग मोटरमुळे निर्माण झाली आहे. नोव्हेंबर २०२५ नंतर उत्पादनात समाविष्ट केलेल्या या मोटरच्या हार्डवेअरमध्ये बदल करण्यात आला होता.

जेव्हा चालक ‘मेमरी सीट’ फंक्शनचा वापर करतो, तेव्हा ही मोटर सीटच्या पोझिशनचा चुकीचा अंदाज लावते. ड्रायव्हरने सेट केलेल्या पोझिशनवर सीट येण्याऐवजी, ती पूर्णपणे मागे ढकलली जाते.

ही समस्या कधी उद्भवू शकते?

  • की-फॉब किंवा मोबाईल ॲपने कार रिमोट अनलॉक करताना.
  • रिमोट स्टार्ट चालू केल्यास.
  • पॅसिव्ह वेलकम फीचरद्वारे चावी खिशात ठेवून गाडीजवळ गेल्यास.
  • मॅन्युअली मेमरी सीट बटण दाबल्यावर.
प्रवाशांच्या सुरक्षेला धोका?

या तांत्रिक बिघाडामध्ये सीटच्या मागे अडथळा ओळखणारे सेन्सर्स काम करत नाहीत. त्यामुळे ड्रायव्हरच्या मागे दुसऱ्या रांगेत बसलेल्या प्रवाशाचे पाय किंवा शरीर सीटखाली दाबले जाण्याची आणि दुखापत होण्याची दाट शक्यता निर्माण होते.

प्रीमियम प्रवासाचा नवा अनुभव! फोर्स मोटर्सची ‘अर्बानिया डिलक्स’ बाजारात दाखल, किंमत २८.७० लाखांपासून सुरू

एक दिलासादायक बाब

ही मेमरी सिस्टीम गाडीचा वेग ताशी ५ किमी पेक्षा जास्त झाल्यावर आपोआप बंद होते. त्यामुळे गाडी चालवत असताना ही सीट आपोआप मागे झुकण्याचा धोका नाही.

तक्रारी आणि कंपनीचे स्पष्टीकरण

जून २०२६ च्या सुरुवातीला या संदर्भात कंपनीकडे तक्रारी येण्यास सुरुवात झाली होती. जूनच्या अखेरपर्यंत अशा १३३ घटनांची नोंद झाली होती. सुदैवाने, या समस्येमुळे आतापर्यंत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.

काय असेल उपाय?

फोर्ड सध्या या समस्येवर पूर्ण तोडगा काढण्याचे काम करत आहे. सॉफ्टवेअर अपडेट करून सीट मेमरी लॉजिक री-कॅलिब्रेट केले जाण्याची शक्यता आहे. गरज पडल्यास ड्रायव्हर सीटची बॅकफ्रेम असेंबली बदलून दिली जाईल. ग्राहकांना गाडी मोफत दुरुस्त करून देण्यासाठी कंपनी लवकरच अधिकृत सूचना पाठवेल.

Web Title: Ford explorer and lincoln aviator recalled over faulty driver seats auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा
1

इलेक्ट्रिक मोटरसायकल Raptee.HV T30च्या डिलेव्हरीला ‘या’ शहरात सुरुवात; फुल चार्जमध्ये 200 किलोमीटरचा दावा

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
2

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
4

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.