Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक
कार सर्व्हिसिंगमध्ये नक्की काय काय केले जाते? जाणून घ्या संपूर्ण माहिती
किया सेल्टोस ही लांबी, रुंदी आणि व्हीलबेसच्या बाबतीत निसान टेक्टॉन पेक्षा मोठी आहे. सेल्टोस रस्त्यावर जास्त मोठी आणि प्रिमियम दिसते. तर दुसरीकडे, टेक्टॉन जास्त ग्राउंड क्लीयरेंस देतो. ज्यामुळे खराब रस्त्यांवर देखील गाडी चालवणं अतिशय सोपं होतं. याशिवाय, टेक्टॉनमध्ये मोठे बूट स्पेस मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे मोठ्या प्रवासादरम्यान जास्त सामान ठेऊ शकतो. (फोटो सौजन्य: Pinterest)
निसान टेक्टॉनमध्ये दोन टर्बो पेट्रोल इंजिन मिळणार आहे. पहिले 1.0 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे, जे सुमारे 100 बीएचपीची पावर ऑफर करणार आहे. यासोबतच 6-स्पीड मॅनुअल गियरबॉक्स मिळणार आहे. दुसरे 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन असणार आहे, जे 160 बीएचपी पावर ऑफर करणार आहे. या इंजिनसोबत 6-स्पीड मॅनुअल आणि 7-स्पीड वेट क्लच डीसीटी ऑटोमॅटिक गियरबॉक्स पर्याय मिळणार आहेत.
किया सेल्टोसमध्ये 1.5 लीटर नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 115 बीएचपीची पावर ऑफर करते. याशिवाय 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील दिले आहे. जे 150 बीएचपीची शक्ती देते. यामध्ये मॅनुअल, सीव्हिटी आणि डिसीटी गियरबॉक्सचे पर्याय मिळणार आहेत. किया सेल्टोसची विशेषत: म्हणजेच यामध्ये 115 बीएचपी क्षमत असणारे 1.5 लीटर डीझेल इंजिन देखील आहे, ज्यासोबत मॅनुअल आणि टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक गियरबॉक्सचा पर्याय उपलब्ध आहे. ज्या ग्राहकांना डिझेल इंजिन पाहिजे, त्यांच्यासाठी सध्या किया सेल्टोस एक चांगला पर्याय ठरू शकते.
दोन्ही गाड्या अतिशय मॉडर्न आणि प्रीमियम आहेत. दोन्हीमध्ये पॅनोरमिक सनरूफ, डुअल-जोन क्लाइमेट कंट्रोल, ADAS सेफ्टी फीचर्स, वेंटिलेटेड सीट्स आणि अनेक ॲडव्हांस टेक्नोलॉजी फीचर्स देखील पाहायला मिळणार आहेत. किया सेल्टोसमध्ये हेड-अप डिस्प्ले (HUD) आणि अधिक इलेक्ट्रिक सीट ॲडजस्टमेंट यांसारखे एक्स्ट्रा फीचर्स ऑफर केले जातात. तर दुसरीकडे निसान टेक्टॉनमध्ये पावर्ड टेलगेट आणि पावर्ड फ्रंट पॅसेंजर सीट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
जून २०२६ मध्ये ‘या’ सेडान गाड्यांची झाली बंपर विक्री; डिझायर, अमेझ आणि ऑराने मारली बाजी!
निसान टेक्टॉन जास्त चांगला पर्याय ठरणार आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 10.40 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 18.50 लाख रुपये आहे. तर किया सेल्टोसची किंमत सुमारे 11 लाखांपासून 22 लाख रुपयांपर्यंत आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्स आणि पावरफुल इंजिन पाहिजे असेल तर तुम्ही टेक्टॉनची निवड करू शकता. तर ज्यांना अधिक फीचर्स, डिझेल इंजिन आणि ब्रँड व्हॅल्यू हवी आहे, त्यांच्यासाठी किया सेल्टोस ही एक उत्कृष्ट एसयूव्ही आहे.






