Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘नो कॅप’ ते ‘स्ले’! आजच्या Gen Z तरुणाईच्या या आहे काही भन्नाट ट्रेंडी स्लँग्स! एका क्लिकवर पाहून घ्या

आजच्या डिजिटल युगातील तरुणाईच्या संभाषणात 'नो कॅप', 'रिझ' आणि 'लो-की' यांसारख्या अनोख्या 'Gen Z स्लॅंग्स'चा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 29, 2026 | 09:06 PM
‘नो कॅप’ ते ‘स्ले’! आजच्या Gen Z तरुणाईच्या या आहे काही भन्नाट ट्रेंडी स्लँग्स! एका क्लिकवर पाहून घ्या
Follow Us
Follow Us:

आजकालच्या कॉलेज कट्ट्यांवर किंवा सोशल मीडियावर तरुणांचे संभाषण ऐकले, तर अनेकदा डोक्यावरून विमाने जातात. १९९७ ते २०१२ दरम्यान जन्मलेल्या ‘जेन झी’ (Gen Z) पिढीची इंग्रजी शब्दांना मोडून-तोडून तयार केलेली स्वतःची एक वेगळीच ‘स्लँग भाषा’ आहे. जर तुम्हाला या डिजिटल जगासोबत अपडेट राहायचे असेल, तर हे २० लोकप्रिय स्लँग्स आणि त्यांचे मराठीतील मजेशीर अर्थ नक्की समजून घ्या:

१. Rizz (रिझ): एखाद्याला आकर्षित करण्याची किंवा भुरळ घालण्याची कला (रोमँटिक चार्म).

२. No Cap (नो कॅप): ‘खरोखरच’ किंवा ‘मी अजिबात खोटे बोलत नाहीये’.

३. Cap (कॅप): खोटे बोलणे किंवा थापा मारणे.

४. Bet (बेट): ‘नक्कीच’ किंवा ‘चला, मंजूर आहे’. एखाद्या गोष्टीला सहमती दर्शवण्यासाठी हा शब्द वापरतात.

५. G.O.A.T (गोट): ‘Greatest Of All Time’ (सर्वकालीन सर्वोत्तम). क्रिकेटमध्ये सचिन किंवा मेस्सीला ‘गोट’ म्हटले जाते.

६. Slay (स्ले): काहीतरी अप्रतिम करणे किंवा कपड्यांमध्ये खूप सुंदर, कडक दिसणे.

Gen-Z Travel : लांब सुट्ट्यांपेक्षा 3 दिवसांचे ‘वीकेंड गेटवे’! भारतीय जेन-झेड तरुणांनी बदलले पर्यटनाचे जुने नियम; जाणून घ्या नवीन

७. Flex (फ्लेक्स): स्वतःकडील वस्तूंचा किंवा पैशांचा इतरांसमोर बडेजाव करणे, तोरा दाखवणे.

८. Sus (सस): ‘शंकास्पद’ (Suspicious). काहीतरी गडबड किंवा संशयास्पद वाटल्यास हा शब्द वापरतात.

९. Delulu (डेलुलू): भाबड्या भ्रमात किंवा कल्पनेत जगणारी व्यक्ती (Delusional).

१०. Simp (सिम्प): एखाद्याच्या प्रेमात वेडे होऊन तिच्यासाठी/त्याच्यासाठी वाटेल ते करायला तयार असणारा ‘मजनू’.

११. Vibe Check (वाइब चेक): एखाद्या व्यक्तीची किंवा जागेची ऊर्जा आणि वातावरण कसे आहे, हे तपासणे.

१२. Main Character Energy (मेन कॅरेक्टर एनर्जी): स्वतःला एखाद्या चित्रपटाचा मुख्य नायक किंवा नायिका समजून जगणारा आत्मविश्वास.

१३. Ate (एट): एखाद्या कामात किंवा परफॉर्मन्समध्ये अगदी उत्कृष्ट कामगिरी करणे (उदा. “She ate that dance!”).

१४. Era (इरा): आयुष्यातील एखादा विशिष्ट काळ किंवा फेज (उदा. ‘फिटनेस इरा’).

AI Success Story: वयाच्या १९ व्या वर्षी एआयच्या बळावर दरमहा १ कोटींची कमाई; ‘एंटर्न’ स्टार्टअप उभारणाऱ्या आयुषची गोष्ट एकदा वाचाच

१५. Glow Up (ग्लो अप): रूप, व्यक्तिमत्त्व किंवा मानसिकतेमध्ये झालेला कमालीचा सकारात्मक बदल.

१६. Tea (टी): ‘गॉसिप’ किंवा आतील मसालेदार बातमी (उदा. “Spill the tea” म्हणजे काय ती गुपिते सांग).

१७. Ghosting (घोस्टिंग): अचानक कोणत्याही कारणाशिवाय समोरच्याशी संपर्क तोडणे किंवा गायब होणे.

१८. Valid (व्हॅलिड): योग्य, पटण्यासारखे किंवा रास्त असणे.

१९. Gucci (गुच्ची): ब्रँडचे नाव असले तरी स्लँगमध्ये याचा अर्थ ‘सगळं काही मस्त, ठीक चालू आहे’ असा होतो.

२०. Lowkey (लो-की): गुपचूप, शांतपणे किंवा मनातून (उदा. मला लो-की ती आवडते).

तर हे आहेत आजच्या तरुणाईचे संवाद सोपे करणारे शब्द. आता पुढच्या वेळी जेव्हा एखादा मित्र ‘नो कॅप’ किंवा ‘रिझ’ वापरेल, तेव्हा गोंधळून न जाता ‘व्हाइब’ मॅच करा!

Web Title: Gen z slangs meaning in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 09:06 PM

Topics:  

  • Gen Z
  • LIFESTYLE

संबंधित बातम्या

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा
1

हर हर महादेव! श्रावण महिन्यानिमित्त आप्तेष्ट आणि मित्रमैत्रिणींना पाठवा मराठमोळ्या भक्तिमय शुभेच्छा

Magicbricks Housing Sentiment  : भाड्याच्या घराला रामराम! तरुण भारतीयांमध्ये घर खरेदी करण्याचं क्रेझ; 3-4 BHK घरांना मोठी पसंती
2

Magicbricks Housing Sentiment : भाड्याच्या घराला रामराम! तरुण भारतीयांमध्ये घर खरेदी करण्याचं क्रेझ; 3-4 BHK घरांना मोठी पसंती

स्मार्टवॉच घातल्याने खरंच होतो कॅन्सर? जाणून घ्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमधील खरे सत्य
3

स्मार्टवॉच घातल्याने खरंच होतो कॅन्सर? जाणून घ्या सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांमधील खरे सत्य

जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा
4

जुन्या कपड्यांना नवी दिशा! रिफाइबरची ‘न वापरलेल्या कपड्यांपासून स्वातंत्र्य’ मोहीम, मुंबईतून २.७ टन कपडे जमा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.