Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारणामुळे Harley Davidson च्या हजारो बाईक्समध्ये झाला मोठा बिघाड, फटाफट रिकॉल जारी

जगभरात दमदार परफॉर्मन्ससाठी Harley Davidson च्या बाईक्स ओळखल्या जातात. मात्र, आता कंपनीच्या तब्बल 17000 बाईक्समध्ये बिघाड झाला आहे. ज्यामुळे कंपनीने त्वरित रिकॉल जारी केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2026 | 05:06 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Harley Davidson च्या बाईक्स जगभरात लोकप्रिय
  • मात्र, अचानक कंपनीच्या तब्बल 17000 बाईक्समध्ये बिघाड
  • नेमके यामागील कारण काय?
भारतासह जगभरात प्रीमियम बाईक्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक रायडर्स मंडळी तर नेहमीच विविध ऑटो ब्रॅण्ड्सच्या बाईक्स वापरत असतात. अशीच एक प्रीमियम बाईक उत्पादक कंपनी म्हणजे Harley Davidson. मात्र, आता कंपनी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

भारताव्यतिरिक्त, Harley-Davidson आपल्या बाईक्स जगभरातील अनेक देशांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देते. प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, या कंपनीच्या हजारो बाईक्समध्ये काही दोष आढळून आले आहेत; ज्यामुळे कंपनीला ‘रिकॉल’ सूचना जारी करावी लागली आहे. चला जाणून घेऊयात, बाईकमध्ये नेमके कोणते दोष आढळून आले आहे.

मायलेजचा बादशाह! डबल CNG सिलेंडरसह मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार ‘ही’ कार, मिळणार अफलातून फीचर्स

रिकॉल जारी

प्रसारमाध्यमांच्या वृत्तांनुसार, Harley-Davidson च्या हजारो वाहनांमध्ये दोष आढळून आल्यानंतर, कंपनीने ‘रिकॉल’ जारी केला आहे. हा रिकॉल प्रामुख्याने केवळ ‘युनायटेड स्टेट्स’ (अमेरिका) साठी लागू आहे.

रिकॉल केलेल्या वाहनांची संख्या

युनायटेड स्टेट्समध्ये Harley-Davidson च्या अंदाजे 17000 वाहनांसाठी रिकॉल जारी करण्यात आला आहे. या रिकॉलमध्ये 2025 आणि 2026 या वर्षांतील मॉडेलचा समावेश आहे.

कोणत्या बाईकमध्ये आढळली खराबी?

रिपोर्टनुसार, साधारणपणे चार वेगवेगळ्या बाईक्स मॉडेल्समध्ये खराबी आढळून आल्यानंतर, त्या परत बोलावून घेण्याचा निर्णय करण्यात आले आहेत. यामध्ये ‘स्ट्रीट बॉब’, ‘हेरिटेज क्लासिक’, ‘लो रायडर एस’ आणि ‘लो रायडर एसटी’ यांसारख्या मॉडेल्सचा समावेश आहे.

हे Car Valet Mode म्हणजे नेमके काय? जाणून घ्या कधी आणि केव्हा करता येईल ‘या’ फिचरचा पुरेपुर वापर

नेमकी समस्या काय?

रिपोर्ट्सनुसार Harley-Davidson च्या सुमारे 17 हजार युनिट्समध्ये ब्रेक लाईन आणि बॉडी कंट्रोल मॉड्यूलमध्ये बिघाड आढळू शकतो. यामुळे ब्रेक फ्लूइड गळती होण्याची शक्यता असून रिअर ब्रेक पूर्णपणे निकामी होऊ शकतो. अशी समस्या उद्भवल्यास प्रवासादरम्यान आपत्कालीन ब्रेकिंग करताना अपघात होण्याचा धोका वाढतो.

भारतामध्येही रिकॉल होणार का?

मीडिया रिपोर्ट्सनुसार सध्या हा रिकॉल फक्त अमेरिकेमध्ये जाहीर करण्यात आला आहे. भारत किंवा इतर देशांमध्ये यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कंपनीकडून प्रभावित युनिट्स असलेल्या ग्राहकांना ई-मेल, फोन किंवा मेसेजद्वारे संपर्क करून या रिकॉलबाबत माहिती दिली जात आहे.

ग्राहकांनी काय करावे?

ज्या ग्राहकांना रिकॉलबाबत सूचना मिळाल्या आहेत, त्यांनी आपली बाईक जवळच्या अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये घेऊन जावी. तेथे वाहनाची तपासणी केली जाईल आणि ज्या युनिट्समध्ये समस्या आढळेल, त्यांचे संबंधित पार्ट कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय बदलून दिले जातील.

Web Title: Harley davidson recall announced for 17 thousand bikes due to failure of brake line and body control module

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • harley davidson

संबंधित बातम्या

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना
1

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स
2

कावासाकीच्या बाइक्सवर सप्टेंबरमध्ये मोठी सूट! तब्बल Rs. 2.89 लाखांपर्यंत सूट मिळणार! पाहा ऑफर्स

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!
3

BMW i5 लाँग व्हीलबेस भारतात लाँच! ₹79.60 लाखांत मिळणार ही लक्झरी इलेक्ट्रिक सेडान!

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल
4

शाओमीच्या नव्या SUVची एन्ट्री! 1,705 km रेंजसह N70 आणि N90  मार्केटमध्ये दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.