फोटो सौजन्य: Gemini
Valet Mode हा एक सेफ्टी फीचर आहे, जे सुरू केल्यावर कारमधील काही महत्त्वाचे फंक्शन्स मर्यादित केले जातात. त्यामुळे कार पार्क करणाऱ्या व्यक्तीला फक्त आवश्यक तेवढाच वापर करता येतो. यामुळे तुमची प्रायव्हसी कायम राहते आणि सामानही सुरक्षित राहते.
Valet Mode ऑन केल्यावर कारमधील अनेक फीचर्स नियंत्रित होतात. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, पण काम साधारण एकसारखेच असते. सर्वप्रथम, हे कारच्या वेगावर मर्यादा आणते, त्यामुळे कोणीही कार वेगात चालवू शकत नाही. तसेच स्पोर्ट्स मोड किंवा ऑटो ड्राइव्हसारखे काही विशेष मोड बंद होतात, ज्यामुळे कार सामान्य पद्धतीनेच चालवली जाते.
यासोबतच, हे फीचर कारची डिक्की आणि ग्लोव्ह बॉक्स लॉक करते, ज्यामुळे तुमची कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतात. तसेच कारची स्क्रीन आणि नेव्हिगेशन सिस्टमही बंद केली जाते, जेणेकरून तुमची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहील.
नवीन 2026 Kia Syros भारतात लाँच, नव्या व्हेरिएंटमध्ये मिळणार उत्तम सेफ्टी फीचर्स, किंमत…
Valet Mode सुरू करणे खूप सोपे आहे. कारच्या स्क्रीनवर पिन टाकून ते सुरू करता येते. काही कारमध्ये हे फीचर मोबाईल ॲप किंवा की-फॉबद्वारेही ॲक्टिव्ह करता येते. बंद करायचे असल्यास त्याच पिनचा वापर करून ते ऑफ करता येते.
जेव्हा तुम्ही हॉटेल, मॉल किंवा रेस्टॉरंटमध्ये व्हॅलेट पार्किंगसाठी कार देता, तेव्हा हे फीचर नक्की वापरा. यामुळे तुम्ही निर्धास्तपणे कार इतरांकडे देऊ शकता. तसेच, जर तुम्ही तुमची कार मित्राला किंवा इतर कुणाला चालवण्यासाठी देत असाल, तरीही हा मोड उपयुक्त ठरतो. यामुळे कारचा वेग नियंत्रित ठेवता येतो आणि सुरक्षित ड्रायव्हिंग सुनिश्चित होते.






