Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harley-Davidson X350T EICMA 2026 मध्ये सादर! 350 cc इंजिन, Riding Modes आणि Traction Control; अजून काय मिळणार खास

Harley-Davidson X350T मध्ये 350 cc इंजिन, ट्रेलिस फ्रेम, USD फ्रंट सस्पेन्शन आणि स्विचेबल ABS मिळते. 18% GST स्लॅबमध्ये येणारी ही मोटरसायकल भारतातील मिड-साईज बाईक सेगमेंटमध्ये ट्रायम्फ आणि KTM ला स्पर्धा देऊ शकते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 05, 2026 | 10:01 AM
Harley-Davidson X350T EICMA 2026 मध्ये सादर! 350 cc इंजिन, Riding Modes आणि Traction Control; अजून काय मिळणार खास
Follow Us
Follow Us:
  • हार्ले-डेव्हिडसन X350T मध्ये 350 cc इंजिन, ट्रेलिस फ्रेम आणि USD फ्रंट सस्पेन्शन देण्यात आले आहे.
  • रायडिंग मोड्स, स्विचेबल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोलसह अनेक इलेक्ट्रॉनिक फीचर्स मिळतात.
  • 350 cc पर्यंतच्या बाईकवरील 18% GST मुळे भारतीय कस्टमर्ससाठी किंमत स्पर्धात्मक राहण्याची शक्यता आहे.

अमेरिकन मोटरसायकल कंपनी हार्ले-डेव्हिडसनने (Harley-Davidson) EICMA 2026 मध्ये आपली नवीन Harley-Davidson X350T मोटरसायकल सादर केली आहे. विशेष म्हणजे, ही बाईक भारतातील 350 cc पर्यंतच्या मोटरसायकलवरील सुधारित GST दरांचा फायदा लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे. यामध्ये 350 cc इंजिन, ट्रेलिस फ्रेम, USD फ्रंट सस्पेन्शन, रायडिंग मोड्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारखी फीचर्स मिळतात. भारतीय मार्केटला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेली ही बाईक मिड-साईज मोटरसायकल सेगमेंटमध्ये नवीन स्पर्धा निर्माण करू शकते.

भारतामध्ये GST रचनेत बदल झाल्यानंतर 350 cc पर्यंतच्या मोटरसायकलवर 18% GST लागू करण्यात आला आहे, तर 350 cc पेक्षा जास्त इंजिन कॅपसिटी असलेल्या बाईकवर 40% GST आकारला जातो. यामुळे मोटरसायकल कंपन्या आपल्या इंजिनच्या कॅपसिटीमध्ये बदल करून नवीन मॉडेल्स आणत आहेत. बजाज ऑटोनेही KTM आणि ट्रायम्फच्या काही मोटरसायकल्सचे 350 cc व्हर्जन सादर केले आहेत. आता हार्ले-डेव्हिडसननेही X350T च्या माध्यमातून याच सेगमेंटमध्ये प्रवेश केला आहे.

हार्ले-डेव्हिडसनची नवीन स्प्रिंट 440 क्रूझर बाइक सादर; लवकरच भारतात होणार लाँच! पाहा काय असेल खास

डिझाइनच्या बाबतीत X350T मध्ये फ्लॅट-ट्रॅक मोटरसायकलपासून प्रेरित स्टाइलिंग देण्यात आले आहे. यापूर्वी सादर झालेल्या X440T प्रमाणेच या बाईकमध्ये स्पोर्टी लूक पाहायला मिळतो. चेकर्ड ग्राफिक्स, ट्रेलिस फ्रेम आणि USD फ्रंट सस्पेन्शन ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत. कंपनीने चेसिसची रचना कमी वेगात सहज हाताळणी, हायवेवर स्थिरता आणि रायडिंग कम्फर्ट लक्षात घेऊन केली आहे.

फीचर्सच्या बाबतीत या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी, सिलेक्टेबल रायडिंग मोड्स, स्विचेबल ABS आणि ट्रॅक्शन कंट्रोल देण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक थ्रॉटलमुळे रायडिंग मोड्स आणि ट्रॅक्शन कंट्रोल यांसारख्या सुविधांचे नियंत्रण करता येते. कंपनीने इंजिनचा टॉर्क आपल्या सेगमेंटमध्ये सर्वोत्तम असल्याचे म्हटले आहे, पण त्याचा अचूक आकडा जाहीर केलेला नाही. तसेच ही बाईक भारतीय रस्त्यांच्या परिस्थितीनुसार ट्यून करण्यात आली असून BS6 OBD2P2 नियमांचे पालन करते.

Hero Scrambler Concept EICMA 2026 मध्ये सादर! Dakar Rally स्टाइलसह प्रीमियम बाइकची झलक

दरम्यान, EICMA 2026 मध्ये हार्ले-डेव्हिडसनने हिरो मोटोकॉर्पसोबतच्या भागीदारीत विकसित केलेली स्प्रिंट 440 देखील सादर केली आहे. या बाईकमध्ये 440 cc सिंगल-सिलेंडर इंजिन असून ते 27 hp पॉवर आणि 38 Nm टॉर्क देते. अमेरिकेत ही बाईक 2027 च्या वसंत ऋतूमध्ये लाँच होणार आहे, तर भारतातही येत्या काही महिन्यांत तिची एन्ट्री होण्याची शक्यता आहे. X350T ही X440T आणि X440S सोबत कंपनीच्या मोटरसायकल पोर्टफोलिओमध्ये स्थान मिळवू शकते. तिची किंमत आणि भारतातील लाँचची तारीख अजून जाहीर झालेली नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Harley-Davidson X350T मध्ये किती cc चे इंजिन आहे?

    Ans: Harley-Davidson X350T मध्ये 350 cc इंजिन देण्यात आले आहे. कंपनीने या इंजिनची अचूक पॉवर आणि टॉर्क आकडेवारी जाहीर केलेली नाही.

  • Que: Harley-Davidson X350T मध्ये कोणते फीचर्स मिळतात?

    Ans: या बाईकमध्ये इलेक्ट्रॉनिक थ्रॉटल बॉडी, सिलेक्टेबल रायडिंग मोड्स, स्विचेबल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, ट्रेलिस फ्रेम आणि USD फ्रंट सस्पेन्शन मिळते.

  • Que: Harley-Davidson X350T भारतात कधी लाँच होणार आहे?

    Ans: कंपनीने भारतातील लाँचची तारीख आणि किंमत जाहीर केलेली नाही. ही बाईक खास भारतीय मार्केटला लक्षात घेऊन विकसित करण्यात आली आहे.

Web Title: Harley davidson x350t eicma 2026 india 350cc motorcycle auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • harley davidson

संबंधित बातम्या

बाईक छोटी, स्वप्नं मोठी! Hero Xpulse 150 ची धमाकेदार एंट्री! 150 cc इंजिनसह कमी किमतीत मिळणार Adventure Bike?
1

बाईक छोटी, स्वप्नं मोठी! Hero Xpulse 150 ची धमाकेदार एंट्री! 150 cc इंजिनसह कमी किमतीत मिळणार Adventure Bike?

Hero XPulse 450 EICMA 2026 मध्ये सादर! 421 cc इंजिन, 46 hp पॉवर आणि रॅली DNA सह जबरदस्त लुक
2

Hero XPulse 450 EICMA 2026 मध्ये सादर! 421 cc इंजिन, 46 hp पॉवर आणि रॅली DNA सह जबरदस्त लुक

निसान मॅग्नाइट आणि ग्रॅवाइटवर फ्री CNG किट! 85,999 रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी
3

निसान मॅग्नाइट आणि ग्रॅवाइटवर फ्री CNG किट! 85,999 रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन आणि एआरएआयचा मोठा करार! पुण्यात उभारणार अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर
4

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन आणि एआरएआयचा मोठा करार! पुण्यात उभारणार अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.