Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन आणि एआरएआयचा मोठा करार! पुण्यात उभारणार अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया आणि एआरएआयने पुण्यातील चाकण येथे आधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर उभारण्यासाठी करार केला आहे. या सुविधेमुळे इलेक्ट्रिक कारची सुरक्षा, वाहन चाचण्या आणि भारत एनसीएपी मूल्यांकनाला जास्त गती मिळण्याची शक्यता आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 04, 2026 | 06:04 PM
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन आणि एआरएआयचा मोठा करार! पुण्यात उभारणार अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर
Follow Us
Follow Us:
  • स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया आणि एआरएआयच्या करारातून पुण्यात आधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर उभारले जाणार आहे.
  • चाकणमधील नवीन सुविधा इलेक्ट्रिक वाहनांच्या सुरक्षा चाचण्या आणि भारत एनसीएपी मूल्यांकन प्रक्रियेला जास्त गती देणार आहे.
  • या प्रकल्पामुळे भारतातील वाहन संशोधन, स्थानिक अभियांत्रिकी आणि सुरक्षित कार विकासाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) आणि ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) यांनी चाकण, पुणे येथील वाहन सुरक्षा आणि चाचणी पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यासाठी एका ऐतिहासिक सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या करारांतर्गत एसएव्हीडब्ल्यूआयपीएल आपल्या चाकण प्रकल्पाजवळील भूखंड एआरएआयकडे हस्तांतरित करणार असून, तेथे भविष्यातील मोबिलिटी वाहनांसाठी अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सुविधा उभारली जाईल.

हा सामंजस्य करार केंद्रीय अवजड उद्योग आणि पोलाद मंत्री माननीय एच.डी. कुमारस्वामी, एसएव्हीडब्ल्यूआयपीएलचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ पीयूष अरोरा आणि एआरएआयचे डायरेक्टर डॉ. रेजी मथाई यांच्या उपस्थितीत पार पडला. ही नवीन सुविधा इलेक्ट्रिक वाहनांच्या चाचण्या, सुरक्षा मानके आणि भारत एनसीएपी (NCAP) मूल्यांकनांना अधिक गती देईल.

2026 स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट भारतात लाँच; किंमत फक्त ₹9.99 लाखांपासून सुरु

या प्रसंगी बोलताना केंद्रीय मंत्री श्री. एच. डी. कुमारस्वामी* म्हणाले, “भारतातील ऑटोमोटिव्ह क्षेत्र वेगाने पुढे जात असताना स्थानिक आरअँडडी आणि सुरक्षा चाचणी पायाभूत सुविधांचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक आहे. चाकणमध्ये ही सुविधा उभारून आम्ही भविष्यातील भारत एनसीएपीच्या गरजांची जलद अंमलबजावणी करण्यास मदत करत आहोत. यामुळे भारताच्या रस्ते सुरक्षा आव्हानांवर मात करण्यासोबतच जागतिक बाजारपेठेतील कठोर गरजा पूर्ण करणारी वाहने विकसित करण्यास मदत होईल.”

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ पीयूष अरोरा म्हणाले, “वाहन सुरक्षा आणि स्थानिक अभियांत्रिकी क्षमता आमच्या कामकाजाच्या केंद्रस्थानी आहे. एआरएआयला आमच्या चाकण प्रकल्पाशेजारी क्रॅश टेस्ट सुविधेसाठी जमिनीची आवश्यकता भासली, तेव्हा आम्ही आमच्या भविष्यातील विस्तार आराखड्यात आवश्यक बदल केले. आमच्या ‘इंडिया २.०’ वाहनांना ग्लोबल एनसीएपीकडून ५-स्टार रेटिंग मिळाले आहे. हा धोरणात्मक सहयोग भारतातील अधिक सुरक्षित वाहनांच्या विकासाला आणि ईव्ही तंत्रज्ञानाला गती देईल.”

JSW Group आणि Skoda Auto Volkswagen यांचा संयुक्त उपक्रम! भारतातील उत्पादनाला मिळणार मोठी चालना

एआरएआयचे डायरेक्टर डॉ. रेजी मथाई म्हणाले, “हा सामंजस्य करार भारताच्या ऑटोमोटिव्ह चाचणी आणि सुरक्षा पायाभूत सुविधांमधील एक धोरणात्मक मैलाचा दगड आहे. वाहनांचे तंत्रज्ञान वेगाने विकसित होत असताना प्रगत व्हॅलिडेशन आणि क्रॅश टेस्ट क्षमतांची गरज सातत्याने वाढत राहील. आगामी अनेक दशके मोबिलिटी क्षेत्राला उपयुक्त ठरेल अशी जागतिक दर्जाची यंत्रणा उभारण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे.”

💡

Frequently Asked Questions

  • Que: स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया आणि एआरएआयमध्ये कोणता करार झाला आहे?

    Ans: दोन्ही संस्थांनी पुण्यातील चाकण येथे आधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

  • Que: नवीन क्रॅश टेस्ट सेंटर कुठे उभारले जाणार आहे?

    Ans: स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडियाच्या चाकण प्रकल्पाजवळील जागेवर एआरएआय हे सेंटर उभारणार आहे.

  • Que: नवीन क्रॅश टेस्ट सेंटरचा भारतातील वाहन उद्योगाला काय फायदा होईल?

    Ans: या सुविधेमुळे वाहनांच्या सुरक्षा चाचण्या, इलेक्ट्रिक वाहनांचे मूल्यांकन, भारत एनसीएपी प्रक्रिया आणि स्थानिक संशोधनाला जास्त गती मिळण्यास मदत होईल.

Web Title: Skoda volkswagen arai pune crash test center vehicle safety auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • Skoda

संबंधित बातम्या

TVS Orbiter चे युरोपमध्ये पदार्पण! रिमूव्हेबल बॅटरीसह मिळणार 105 km रेंज; पाहा अजून काय मिळणार
1

TVS Orbiter चे युरोपमध्ये पदार्पण! रिमूव्हेबल बॅटरीसह मिळणार 105 km रेंज; पाहा अजून काय मिळणार

इटालजेटची भारतात एन्ट्री! इंडिया बाइक वीक 2026 मध्ये ड्रॅगस्टर 300, 459 आणि 700 होणार सादर
2

इटालजेटची भारतात एन्ट्री! इंडिया बाइक वीक 2026 मध्ये ड्रॅगस्टर 300, 459 आणि 700 होणार सादर

Royal Enfield Flying Flea S6 Electric Scrambler सादर! 2027 मध्ये भारतात होणार लाँच, ऑफ-रोडिंगसाठी मिळणार खास फीचर्स
3

Royal Enfield Flying Flea S6 Electric Scrambler सादर! 2027 मध्ये भारतात होणार लाँच, ऑफ-रोडिंगसाठी मिळणार खास फीचर्स

Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन! जगभरात फक्त 100 बाइक्सची विक्री होणार! पाह काय असेल खास
4

Royal Enfield Shotgun 650 Son Of A Gun लिमिटेड एडिशन! जगभरात फक्त 100 बाइक्सची विक्री होणार! पाह काय असेल खास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.