Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

निसान मॅग्नाइट आणि ग्रॅवाइटवर फ्री CNG किट! 85,999 रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी

CNG कार घेण्याचा विचार करताय? निसान मॅग्नाइटवर 74,999 रुपये, तर ग्रॅवाइटवर 85,999 रुपयांचा CNG किटचा खर्च माफ होणार आहे. पण ही ऑफर सर्व व्हेरिएंट्ससाठी लागू नाही!

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Nov 04, 2026 | 06:41 PM
निसान मॅग्नाइट आणि ग्रॅवाइटवर फ्री CNG किट! 85,999 रुपयांपर्यंतची बचत करण्याची संधी
Follow Us
Follow Us:
  • निसान मॅग्नाइटवर 74,999 रुपये, तर ग्रॅवाइटवर 85,999 रुपयांचा CNG रेट्रोफिटमेंट खर्च माफ होणार आहे.
  • ग्रॅवाइटमध्ये प्रत्येकी 25 लिटर कॅपसिटीचे 2 सिलेंडर असून 7-सीटर बैठक व्यवस्था कायम ठेवली आहे.
  • ही ऑफर 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत असून निवडक व्हेरिएंट्सवरच CNG किटचा लाभ मिळणार आहे.

निसान मोटर इंडियाने मॅग्नाइट आणि ग्रॅवाइट या 2 कारवर फेस्टिव्ह सीझनसाठी खास ऑफर जाहीर केली आहे. या ऑफरमध्ये निवडक व्हेरिएंट्सवर CNG रेट्रोफिटमेंटचा खर्च माफ केला जाणार आहे. मॅग्नाइटसाठी 74,999 रुपये, तर ग्रॅवाइटसाठी 85,999 रुपयांचा फायदा मिळणार आहे. ही ऑफर 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे पेट्रोलसोबत CNG चा ऑप्शन शोधणाऱ्या कस्टमर्सना कारच्या खर्चात बचत करण्याची संधी मिळणार आहे.

निसान ग्रॅवाइटमध्ये ट्विन-सिलेंडर CNG सेटअप देण्यात आला आहे. यात प्रत्येकी 25 लिटर कॅपसिटीचे 2 सिलेंडर बसवले आहेत. या रचनेमुळे कारची 7-सीटर बैठक व्यवस्था कायम ठेवण्यास मदत होते. नेहमीच्या मोठ्या सिंगल सिलेंडरऐवजी 2 सिलेंडर वापरल्याने मागच्या भागातील जागेचा वापरही सोयीस्कर होतो. ग्रॅवाइटसाठी हे CNG किट मे 2026 मध्ये 82,999 रुपयांना सादर करण्यात आले होते. सध्या त्याची लिस्टेड किंमत 85,999 रुपये आहे.

निसानच्या गाड्यांवर घसघशीत सूट! ‘टेक्टन’, ‘मॅग्नाइट’ आणि ‘ग्रॅविटे’वर ७० हजार रुपयांपर्यंतची फेस्टिव्ह ऑफर

या दोन्ही कारसाठी CNG रेट्रोफिटमेंट सिस्टीम मोटोझेनने विकसित केली असून तिचे प्रोडक्शन आणि क्वालिटी तपासणीही कंपनीकडून केली जाते. ग्रॅवाइटमधील सिस्टीम BS6.2 नियमांनुसार तयार करण्यात आली आहे आणि तिला ICAT प्रमाणपत्र मिळाले आहे. यात 8.1 mm जाडीचे सिलेंडर आणि Dynamic Advancer टेक्नोलॉजी दिली आहे. CNG फिलर कारच्या फ्युल लिडखाली बसवण्यात आला आहे. चालकाला पेट्रोल आणि CNG मोडमध्ये स्विच करता येते.

मॅग्नाइटसाठी ही ऑफर निवडक नॉन-टर्बो व्हेरिएंट्सवर लागू आहे. Visia MT, Visia EZ-Shift आणि Visia + MT या व्हेरिएंट्सना याचा लाभ मिळणार नाही. ग्रॅवाइटमध्ये Tekna व्हेरिएंटसाठी 85,999 रुपयांचा फायदा दिला जात आहे. दोन्ही मॉडेल्सच्या CNG किटवर 3 वर्षे किंवा 1,00,000 km ची थर्ड पार्टी वॉरंटी मिळते. ही वॉरंटी कारच्या स्टँडर्ड वॉरंटीव्यतिरिक्त आहे.

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

ग्रॅवाइटचे CNG किट 16 राज्यांमधील 60 शहरांत निसान डीलर्सकडून बसवता येते. मॅग्नाइटच्या रेट्रोफिटमेंट किंमतीत किट, सिलेंडर इन्स्टॉलेशन, CNG गॅस, RTO आणि इन्शुरन्स एंडोर्समेंट तसेच थर्ड पार्टी वॉरंटीचा खर्च समाविष्ट आहे. सध्या मॅग्नाइटची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 5.69 लाख रुपये, तर ग्रॅवाइटची किंमत 5.73 लाख रुपये आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: निसान मॅग्नाइटवर फ्री CNG किटची ऑफर किती रुपयांची आहे?

    Ans: निसान मॅग्नाइटसाठी CNG रेट्रोफिटमेंटचा 74,999 रुपयांचा खर्च माफ केला जाणार आहे.

  • Que: निसान ग्रॅवाइट CNG किटमध्ये किती सिलेंडर मिळतात?

    Ans: ग्रॅवाइटमध्ये प्रत्येकी 25 लिटर कॅपसिटीचे 2 सिलेंडर दिले आहेत. यामुळे 7-सीटर बैठक व्यवस्था कायम ठेवता येते.

  • Que: निसानची फ्री CNG किट ऑफर कधीपर्यंत लागू आहे?

    Ans: ही ऑफर 16 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू आहे. मॅग्नाइट आणि ग्रॅवाइटच्या निवडक व्हेरिएंट्सनाच याचा लाभ मिळणार आहे.

Web Title: Nissan magnite gravite free cng retrofitment festive offer 2026 auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • nissan
  • SUV cars

संबंधित बातम्या

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन आणि एआरएआयचा मोठा करार! पुण्यात उभारणार अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर
1

स्कोडा ऑटो फोक्सवॅगन आणि एआरएआयचा मोठा करार! पुण्यात उभारणार अत्याधुनिक क्रॅश टेस्ट सेंटर

TVS Orbiter चे युरोपमध्ये पदार्पण! रिमूव्हेबल बॅटरीसह मिळणार 105 km रेंज; पाहा अजून काय मिळणार
2

TVS Orbiter चे युरोपमध्ये पदार्पण! रिमूव्हेबल बॅटरीसह मिळणार 105 km रेंज; पाहा अजून काय मिळणार

इटालजेटची भारतात एन्ट्री! इंडिया बाइक वीक 2026 मध्ये ड्रॅगस्टर 300, 459 आणि 700 होणार सादर
3

इटालजेटची भारतात एन्ट्री! इंडिया बाइक वीक 2026 मध्ये ड्रॅगस्टर 300, 459 आणि 700 होणार सादर

Royal Enfield Flying Flea S6 Electric Scrambler सादर! 2027 मध्ये भारतात होणार लाँच, ऑफ-रोडिंगसाठी मिळणार खास फीचर्स
4

Royal Enfield Flying Flea S6 Electric Scrambler सादर! 2027 मध्ये भारतात होणार लाँच, ऑफ-रोडिंगसाठी मिळणार खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.