Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero Motocorp: हीरो मोटोकॉर्पची ३६% भागीदारी असलेल्या ‘Euler Motors’चा हरियाणामध्ये १०० कोटींचा नवा प्रकल्प!

हीरो मोटोकॉर्पचे पाठबळ असलेल्या एका आघाडीच्या ब्रँडने हरियाणात केलेल्या १०० कोटींच्या मोठ्या गुंतवणुकीमुळे व्यावसायिक ई-वाहन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या एका वर्षात विक्रीत २० पटीने झालेली अफाट वाढ आणि हाय-टेक वाहनांचे उत्पादन यामुळे भारतीय लॉजिस्टिक्स क्षेत्राचे भविष्य कसे बदलणार, हे पाहणे रंजक ठरेल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 21, 2026 | 09:30 AM
Hero Motocorp: हीरो मोटोकॉर्पची ३६% भागीदारी असलेल्या ‘Euler Motors’चा हरियाणामध्ये १०० कोटींचा नवा प्रकल्प!
Follow Us
Follow Us:
  • ऑयलर मोटर्सने हरियाणातील पलवल येथे १०० कोटींची गुंतवणूक करून नवा उत्पादन प्लांट सुरू केला आहे.
  • या नव्या अत्याधुनिक प्रकल्पामुळे कंपनीची वार्षिक उत्पादन क्षमता आता २४,००० वाहनांपर्यंत पोहोचली आहे.
  • कंपनीची महिन्याची विक्री अवघ्या एका वर्षात ४० वाहनांवरून थेट ८०० वाहनांपर्यंत पोहोचली आहे.

इलेक्ट्रिक कमर्शियल व्हेईकल निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी ऑयलर मोटर्स (Euler Motors) ने हरियाणातील पलवल येथे आपल्या समर्पित चार-चाकी उत्पादनासाठीच्या नवीन प्लांटची सुरुवात केली आहे. हीरो मोटोकॉर्पचे पाठबळ असलेल्या या कंपनीने या नव्या प्लांटसाठी १०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे कंपनीचा संपूर्ण उत्पादन परिसर ४० एकरांवर विस्तारला असून, वार्षिक उत्पादन क्षमता २४,००० वाहनांपर्यंत पोहोचली आहे.

वाढती मागणी आणि उत्पादनाचा विस्तार कमर्शियल कार्गो क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वेगाने वाढत आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात दरमहा अवघ्या ४० चार-चाकी वाहनांची विक्री होत होती. यंदा जून महिन्यात हा आकडा थेट ८०० वाहनांवर पोहोचला आहे. चार-चाकी कार्गो EV क्षेत्रात ऑयलर मोटर्सचा बाजारपेठेतील हिस्सा सुमारे २८% पर्यंत वाढला आहे.

Hero Splendor Off Road Crossover: हिरो स्प्लेंडर आता नव्या ऑफ-रोड रुपात; डिझाइनचे पेटंट भारतात बुक!

नव्या प्लांटची प्रमुख वैशिष्ट्ये:

  • उत्पादन क्षमता: पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यावर हा प्लांट दोन नियमित आणि एका हायब्रिड शिफ्टमध्ये कार्य करेल.
  • आधुनिक तंत्रज्ञान: प्लांटमध्ये स्वयंचलित असेंब्ली कन्व्हेयर लाईन, बॉडी शॉप आणि एकात्मिक बॅटरी-पॅक असेंब्ली लाईनची सोय आहे.
  • प्रमुख मॉडेल्स: या प्लांटमध्ये ‘टर्बो ईव्ही १०००’ (१-टन क्षमतेचा ई-ट्रक) आणि ‘स्टॉर्म ईव्ही’ (ADAS तंत्रज्ञान असलेली भारतातील पहिली कमर्शियल ई-व्हॅन) चे उत्पादन केले जाईल.

Hero Splendor Plus vs. Bajaj Platina 110: रोजच्या ऑफिस किंवा कॉलेजच्या प्रवासासाठी कोणती बाईक ठरेल सर्वात फायदेशीर?

हीरो मोटोकॉर्प आणि ऑयलर मोटर्सची भागीदारी

हीरो मोटोकॉर्पकडे ऑयलर मोटर्सचा ३६% हिस्सा आहे. हीरो मोटोकॉर्पचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल यांनी स्पष्ट केले की, भारतातील कमर्शियल मोबिलिटी क्षेत्र सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर असून, शाश्वत तंत्रज्ञान आणि सरकारी धोरणांमुळे ईव्हीचा स्वीकार वेगाने होत आहे.

ऑयलर मोटर्सचे संस्थापक आणि सीईओ सौरव्ह कुमार यांनी सांगितले की, “हीरो मोटोकॉर्पची साथ ही फक्त भांडवलापुरती मर्यादित नसून त्यांच्या नेटवर्कचाही आम्हाला मोठा फायदा झाला आहे. आमच्या विक्री आणि सर्व्हिस नेटवर्कचा विस्तार ३५ टचपॉइंट्सवरून थेट १०० पेक्षा जास्त टचपॉइंट्स पर्यंत झाला आहे.”

Web Title: Hero backed euler motors haryana plant inaugurated auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicles
  • Hero MotoCorp

संबंधित बातम्या

Simple Electric Scooter: सिम्पल इलेक्ट्रिकची नवी ‘Wave’ स्कूटर २ सप्टेंबरला बाजारात येणार! पाहा काय असेल खास
1

Simple Electric Scooter: सिम्पल इलेक्ट्रिकची नवी ‘Wave’ स्कूटर २ सप्टेंबरला बाजारात येणार! पाहा काय असेल खास

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती
2

500 किमी रेंज आणि कोच डोअर्स! ऑल-इलेक्ट्रिक Genesis GV90 वरून उठला पडदा! पाहा या ब्रँड न्यू कारचे फीचर्स आणि माहिती

कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स आहे? तुमच्या पाल्याला मिळू शकते श्रीराम फायनान्सची स्कॉलरशिप! अर्ज करा या सोप्या पद्धतीने!
3

कमर्शियल ड्रायव्हिंग लायसन्स आहे? तुमच्या पाल्याला मिळू शकते श्रीराम फायनान्सची स्कॉलरशिप! अर्ज करा या सोप्या पद्धतीने!

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!
4

TVS ने Honda ला टाकले मागे! जुलै २०२६ मध्ये स्कूटर विक्रीत प्रथमच घडला हा विक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.