Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hero- Honda होता भारत आणि जपानच्या ऑटोमोबाईल कंपन्यांचा संयुक्त उपक्रम! जाणून घ्या

आपल्या देशात ग्रामीण भागातील सर्वात जास्त पसंतीने घेतल्या जायच्या त्या म्हणजे हिरो-होंडाच्या गाड्या. भारताच्या दुचाकी उद्योगामध्ये हिरो-होंडा हे नाव अविभाज्य घटक आहे. हिरो होंडाच्या या संयुक्त उपक्रमानंतर भारतातील दुचाकी वाहनांच्या विश्वावर त्यांनी राज्य केलं म्हणायला हरकत नाही.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 04, 2026 | 03:08 PM
Hero- Honda होता भारत आणि जपानच्या ऑटोमोबाईल कंपन्यांचा संयुक्त उपक्रम! जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

आपल्या देशात ग्रामीण भागातील सर्वात जास्त पसंतीने घेतल्या जायच्या त्या म्हणजे हिरो-होंडाच्या गाड्या. भारताच्या दुचाकी उद्योगामध्ये हिरो-होंडा हे नाव अविभाज्य घटक आहे. हिरो होंडाच्या या संयुक्त उपक्रमानंतर भारतातील दुचाकी वाहनांच्या विश्वावर त्यांनी राज्य केलं म्हणायला हरकत नाही. भारत आणि जपानच्या ऑटोमोबाईल कंपन्यांनी जुळवून आणलेला हा संयुक्त प्रकल्प कसा यशस्वी ठरला आणि त्यानंतर तो कसा विघटीत झाला, हे आपण आज इथे पाहूयात.

हिरो-होंडाची भागीदारी

1984 मध्ये भारतीय ऑटोमोबाईल Hero Group आणि जपानी Honda Motor Co.Ltd यांनी एक संयुक्त उपक्रम स्थापन केला, ज्याचे नाव Hero Honda Motors Ltd असे ठेवण्यात आले. या दोन्ही कंपन्यांकडे हिरो होंडाची 26-26 टक्क्यांची भागीदारी होती. होंडा ऑटोमोबाईलचे विकसित आणि प्रगत तंत्रज्ञान आणि जबरदस्त उत्पादनाचं कौशल्य तर हिरो समुहाची भारतातील मार्केटची समज आणि विक्रीच जटील जाळ, या दोन्हीच्या समन्वयाने हिरो-होंडा कंपनीने भारतात आपले पाय रोवले.

हिरो होंडाच्या उत्पादन कौशल्याची सर्वात खास गोष्ट होती ती म्हणजे, कमी इंधन खर्चाच्या मोटरसायकली. “Fill it, Shut it, Forget it” अशा आकर्षक जाहिरातींनी कंपनीची विक्री आसमंतात पोहोचवली. स्प्लेंडर, पॅशन आणि सीडी-100 यांसारख्या मोटरसायकलींनी तर भारतीय ग्राहकांची मने जिंकली. 2001 पर्यंत हिरो होंडा ही जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादन कंपन्यांपैकी एक बनली होती.

एक-दोन नव्हे तर होंडा भारतात करणार तब्बल १० नवीन मॉडेल्स लॉन्च

विभक्त होण्याची कारणे

सुमारे २६ वर्षांच्या एकत्र भागीदारीनंतर दोन्हीही कंपन्यांच्या वैयक्तिक उद्दिष्टांमध्ये स्पष्ट फरक दिसू लागला. होण्डला भारतात स्वतःचे स्वतंत्र मालकीचे अस्तित्व सुरु करायचे होते, तर हिरो समूहाला जगभरात आपली बाजारपेठ वाढवायची होती. पण या दोघांत असलेल्या करारामुळे निर्यातीवर आणि इतर उद्दिष्टांमध्ये काही बंधने येत होती. शिवाय कंपनीच्या अंतर्गत धोरणांमध्ये, वाटाघाटीमध्ये अनेक मतभेद येऊ लागले. परिणामी, डिसेंबर २०१० मध्ये दोन्ही कंपन्यांनी हिरो होंडाचा हा संयुक्त उपक्रम संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. 16 डिसेंबर 2010 ला झालेल्या करारानुसार होंडाने आपला 26 टक्के हिस्सा विकण्याची सहमती दर्शवली. त्यानंतर 2011 मध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊन होंडा स्वतंत्रपणे बाहेर पडली.

आता Four Wheeler मार्केट गाजवणार! दुचाकी बनवणाऱ्या Hero Motocorp …

हिरो आणि होंडाचा पुढचा प्रवास

होंडापासून वेगळे झाल्यानंतर हिरो कंपनीने संशोधन आणि विकासावर भर देत जागतिक भागीदारी केल्या आणि आपली बाजारपेठ मजबूत केली. आज Hero MotoCorp ही जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादकांपैकी एक आहे. दुसरीकडे HMSI ने Activa आणि Shine सारख्या मॉडेल्सच्या जोरावर भारतीय बाजारात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

हिरो-होंडा भागीदारी ही भारतीय ऑटोमोबाईल उद्योगातील सर्वात यशस्वी संयुक्त उपक्रमांपैकी एक मानली जाते. त्यांचा विभक्त होण्याचा निर्णय हा संघर्षाचा नव्हे, तर बदलत्या व्यावसायिक गरजांमुळे झालेला एक “Graceful Separation” म्हणून आजही अभ्यासला जातो.

Web Title: Hero honda joint venture separation auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 02:59 PM

Topics:  

  • automobile
  • Hero MotoCorp
  • Honda

संबंधित बातम्या

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
1

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
2

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
3

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती
4

7,000 रुपयांपर्यंत स्वस्त झाल्या Triumph च्या बाइक्स! वाचा आणि फटाफट घेऊन टाका स्वस्तात मस्त! जाणून घ्या किंमती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.