फोटो सौजन्य: @automobiletamil/x.com
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये दमदार बाईक ऑफर होत असतात. गेल्या कित्येक वर्षांपासून मार्केटमध्ये Hero Motocorp उत्तम बाईक ऑफर करतेय. तसेच बदलत्या काळानुसार कंपनी त्यांच्या बाईकमध्ये सुद्धा बदल करत आहे. आता लवकरच कंपंनी त्यांच्या एका बाईकचे नवीन व्हर्जन मार्केटमध्ये आणण्यास सज्ज होत आहे.
भारतामध्ये लवकरच Hero Xtreme 125R चे नवीन व्हर्जन लाँच होणार असून या बाईकमध्ये अनेक आकर्षक बदलांसह नवे फीचर्स देण्यात येणार आहेत. अलीकडेच कंपनीने Glamour X 125 ला अपडेट केले होते आणि आता त्याचाच स्पोर्टी व्हर्जन म्हणजे Xtreme 125R देखील नव्या रुपात आणले जात आहे. चला तर मग जाणून घेऊया या बाईकमध्ये कोणते खास फीचर्स मिळणार आहेत.
Hero Xtreme 125R मध्ये आता रेड आणि ब्लॅक ड्युअल-टोन कलर स्कीम दिली जाईल, जी आधीपेक्षा अधिक आकर्षक आणि स्टायलिश असेल. यासोबतच या बाईकमध्ये बार-एंड मिरर मिळतील. जरी हे पारंपरिक रिअर-व्ह्यू मिररपेक्षा थोडे कमी व्हिजिबिलिटी देत असले तरी त्यांचा स्पोर्टी आणि कूल लूक बाईकला वेगळाच चार्म देईल.
TVS ची पहिली वहिली ॲडव्हेंचर बाईक, लवकरच दमदार फीचर्ससह होणार लाँच
याशिवाय बाईकमध्ये नवे डिजिटल कन्सोल दिले जाणार आहे, जे Hero Glamour X 125 प्रमाणे असू शकते. या कन्सोलमध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कॉल/SMS अलर्ट सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील.
नवीन Hero Xtreme 125R मध्ये राईड-बाय-वायर थ्रॉटल असण्याची अपेक्षा आहे, जे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बाईक नियंत्रित करेल. याव्यतिरिक्त, बाईकमध्ये क्रूझ कंट्रोल देखील असेल, जे लांब पल्ल्याच्या रायडिंग दरम्यान रायडरचा थकवा कमी करेल.
Xtreme 125R मध्ये पूर्वीप्रमाणेच 124.7 cc, एअर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन मिळणार आहे, जे 11.4 PS ची पॉवर आणि 10.5 Nm टॉर्क जनरेट करेल.
Renault Kwid Facelift लवकरच होणार लॉन्च; कमी किमतीत स्टायलिश आणि आधुनिक कार
Hero Xtreme 125R चे नवे व्हर्जन दिवाळी 2025 च्या सुमारास लाँच होण्याची शक्यता आहे. नव्या अपडेट्ससोबत या बाईकच्या किंमतीत साधारण 7,000 रुपयांची वाढ होऊ शकते. याची टक्कर बाजारात TVS Raider 125 आणि नुकतीच लाँच झालेल्या Honda CB125 Hornet सारख्या बाईक्ससोबत होईल.