Home Credit India तर्फे दुचाकी कर्ज सुविधा लाँच
देशातील अग्रगण्य वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या होम क्रेडिट इंडिया कंपनीने आता दुचाकी कर्ज क्षेत्रात प्रवेश करून आपल्या सेवांचा विस्तार केल्याचे जाहीर केले आहे. ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या आपल्या ध्येयाचा एक भाग म्हणून कंपनीने ही नवीन सुविधा सणासुदीच्या काळात लाँच केली आहे. या योजनेद्वारे ग्राहकांना सुलभ डिजिटल प्रक्रिया, कमी व्याजदर आणि आकर्षक EMI योजना मिळणार आहेत, ज्यामुळे प्रवासाचे अधिक परवडणारे साधन उपलब्ध होईल.
या दुचाकी कर्ज योजनेअंतर्गत ग्राहकांना झिरो फोरक्लोजर चार्जेस आणि ईएमआय हॉलिडे ऑप्शन अशा खास ऑफर्सही दिल्या जाणार आहेत. या ऑफर्समुळे ग्राहकांना कर्ज फेडताना फ्लेक्सिबिलिटी मिळेल आणि सणासुदीच्या काळात आर्थिक भार कमी होईल. कंपनीने या योजनेच्या पहिल्या टप्प्यात मुंबई आणि नवी मुंबई येथे सेवा सुरू करण्याचे ठरवले असून, पुढील काही महिन्यांत ही सुविधा देशभर विस्तारली जाईल.
नाव एकसारखेच तरी सुद्धा Mahindra Bolero आणि Bolero Neo मध्ये ‘हा’ आहे फरक
या नव्या उपक्रमाबद्दल बोलताना होम क्रेडिट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक सिंग म्हणाले, “होम क्रेडिट इंडियामध्ये आम्ही ग्राहकाभिमुख, पारदर्शक आणि समजण्यास सोप्या वित्तीय योजना देण्यास वचनबद्ध आहोत. आमचे उद्दिष्ट आर्थिक सर्वसमावेशकतेला चालना देणे आणि प्रत्येक ग्राहकापर्यंत सोपी व विश्वासार्ह कर्जसुविधा पोहोचवणे आहे. दुचाकी कर्ज योजना ही त्याच वचनबद्धतेचा एक भाग आहे.”
या लाँचमुळे होम क्रेडिट इंडियाचा वित्तीय पोर्टफोलिओ आणखी मजबूत होईल. या योजनेद्वारे नव्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल आणि नवोन्मेषी तसेच परवडणाऱ्या कर्ज योजनांद्वारे ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात मदत होईल.
नवीन GST Rates पावले रे बाबा! TVS Jupiter 125 च्या किमतीत मोठी घट, किंमत आता फक्त…
होम क्रेडिट इंडियाकडून सध्या ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजांसाठी विविध वित्तीय उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामध्ये उज्ज्वल ईएमआय कार्डचा समावेश असून, त्याद्वारे ग्राहकांना ₹75,000 पर्यंत कर्ज मर्यादा मिळते. मोबाईल अप्लायन्सेस ईएमआय योजनेतून ग्राहक कमी कागदपत्रांसह किफायतशीर स्मार्टफोन खरेदी करू शकतात, तर होम अप्लायन्सेस ईएमआय अंतर्गत घरगुती वस्तूंसाठी बजेट-फ्रेंडली परतफेडीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
याशिवाय कंपनी वैयक्तिक कर्ज सुविधादेखील पुरवते, ज्याअंतर्गत ग्राहकांना वैद्यकीय खर्च, घराची सजावट, लग्न किंवा आकस्मिक परिस्थितींसाठी ₹4,80,000 पर्यंत रक्कम मिळू शकते.