फोटो सौजन्य: @photublogger/X.com
पूर्वी कार खरेदी करताना 28 टक्के GST टॅक्स भरावा लागत होता. मात्र आता नवीन जीएसटी दरानुसार आपल्याला फक्त 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. यामुळे वाहन खरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. या नवीन जीएसटी बदलांमुळे अनेक लोकप्रिय कारच्या किमतीत मोठी घट झाली आहे. अशीच एक कार म्हणजे Honda Amaze.
ADAS टेक्नॉंलॉजीने सुसज्ज असलेली भारतातील सर्वात परवडणारी कार Honda Amaze, आणखी स्वस्त झाली आहे. नवीन GST 2.0 दर लागू झाल्यानंतर, या कारची किंमत 120,000 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्या आहेत. बेस व्हेरिएंट, S MT (Old Gen), जी पूर्वी 762,800 लाख रुपयांमध्ये उपलब्ध होती, आता फक्त 697,700 एक्स-शोरूममध्ये उपलब्ध आहे. यामुळे मागील किमतीच्या तुलनेत 65,100 रुपयांचीची थेट बचत होते. Honda Amaze ही थेट मारुती डिझायरशी स्पर्धा करते.
Honda Amaze चे केबिन आता अधिक प्रीमियम लुक आणि फील देतं. यात उत्तम दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले असून आत प्रवेश करताच 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम दिली आहे, जी Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट करते. यासोबतच ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, की-लेस एंट्री आणि पुश-बटन स्टार्ट यांसारखी सोयीस्कर फीचर्स दिली आहेत. याशिवाय 420 लिटरचे मोठे बूट स्पेस उपलब्ध करून देण्यात आले आहे, जे सामान ठेवण्यासाठी पुरेसे आहे.
Honda Amaze ही भारतातील सर्वात स्वस्त ADAS (Honda Sensing) असलेली कार मानली जाते. यात लेन-कीपिंग असिस्ट, अॅडाप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम यांसारखी प्रगत टेक्नॉलॉजीची फीचर्स आहेत. याशिवाय कारमध्ये 6 एअरबॅग, ABS सह EBD, रिअर-पार्किंग सेन्सर, रिअर-व्यू कॅमेरा आणि ISOFIX चाइल्ड सीट माउंट्स यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित सेडान म्हणून ओळखली जाते.
GST Rate कमी झाल्याने तरुणाची धडकन असणाऱ्या Kawasaki Bikes किती स्वस्त झाल्या?
नवीन Honda Amaze मध्ये 1.2-लिटर i-VTEC पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे, जे 89 bhp पॉवर आणि 110 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन आता E20 फ्युएल स्टॅंडर्डशी सुसंगत आहे. ग्राहकांसाठी ही कार 5-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्टेप CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या दोन्ही पर्यायांत उपलब्ध आहे. काही व्हेरिएंट्समध्ये अजूनही 1.5-लिटर i-DTEC डिझेल इंजिन मिळतं, जे 100 PS पॉवर आणि 200 Nm टॉर्कसह उत्तम परफॉर्मन्स देते.
Honda Amaze मायलेजच्या बाबतीतही ग्राहकांना आकर्षित करते. याचा पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट 18 ते 19 kmpl पर्यंत मायलेज देतो. पेट्रोल CVT व्हेरिएंट 18 ते 24 kmpl पर्यंतचे मायलेज ऑफर करतो. तर डिझेल व्हेरिएंट सर्वाधिक 24.7 kmpl इतकं मायलेज देतो.