
फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारपेठेत होंडा कार्स कॉम्पॅक्ट सेडानपासून ते मध्यम आकाराच्या एसयूव्हीपर्यंत अनेक उत्कृष्ट कार ऑफर करते. सध्या कंपनी त्यांच्या कार्सची किंमत वाढवण्याची तयारी करत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, होंडा कार्स कारच्या किमती कधी आणि किती वाढवू शकते? त्याबद्दल जाणून घेऊयात.
विदेशात Made In India SUVs ठरल्या ब्लॉकबस्टर! ‘या’ ऑटो कंपनीचा मार्केट शेअर 47 टक्क्यांपेक्षा जास्त
मीडिया रिपोर्ट्सनुसार, होंडा कार्स अनेक सेगमेंटमध्ये कार ऑफर करते. रिपोर्ट्सनुसार, कंपनी लवकरच त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची तयारी करत आहे.
रिपोर्टनुसार, होंडा कारच्या किंमतींमध्ये अंदाजे किती वाढ होईल हे कळलेले नाही. मात्र, उत्पादक येत्या 1 जानेवारी 2026 पासून नवीन किंमती लागू करण्याची अपेक्षा आहे.
Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता
रिपोर्टनुसार, कंपनी नवीन वर्षापासून वाढलेल्या इनपुट खर्चाचा भार ग्राहकांवर टाकू शकते, ज्यामुळे किंमतही वाढू शकते.
होंडा कार इंडियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आमच्या ग्राहकांवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी आम्ही अनेक महिन्यांपासून वाढत्या इनपुट खर्च कमी करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत. मात्र, सततच्या दबावामुळे, आम्ही आता जानेवारी 2026 पासून किंमतींमध्ये सुधारणा लागू करू.”
कंपनी कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंट आणि मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमध्ये तीन कार ऑफर करते. होंडा कॉम्पॅक्ट सेडान म्हणून Honda Amaze, मिड-साईज सेडान म्हणून Honda City आणि मिड-साईज एसयूव्ही म्हणून Honda Elevate ऑफर करते.