फोटो सौजन्य: @beckers1000/X.com
भारतीय बाजारात अनेक अशा ऑटो कंपन्या आहेत, जे जगभरात आपल्या दमदार बाईकसाठी ओळखल्या जातात. अशीच एक कंपनी म्हणजे Honda. होंडाने आपल्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार बजेट फ्रेंडलीपासून ते हाय परफॉर्मन्स बाईक्स लाँच केल्या आहेत. नुकतेच कंपनीने 1000 सीसी सेगमेंटमध्ये एक खास रेट्रो लूक असणारी बाईक ऑफर केली आहे.
होंडा टू-व्हीलर्सने त्यांची नवीन CB1000F सादर केली आहे. काही महिन्यांपूर्वी ती पहिल्यांदा कॉन्सेप्ट मॉडेल म्हणून प्रदर्शित करण्यात आली होती. आता, कंपनीने याचे प्रोडक्शन व्हर्जन सादर केले आहे. ही बाईक CB1000 हॉर्नेट सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली आहे, परंतु याचे डिझाइन क्लासिक लूक कायम ठेवते. बाईकमध्ये मेकॅनिकल बदल देखील करण्यात आले आहेत, ज्यामुळे याला एक वेगळे रायडिंग कॅरेक्टर मिळाले आहे.
फक्त 2 लाखाचं डाउन पेमेंट आणि नवीन Mahindra Bolero तुमच्या दारात उभी! इतकाच असेल EMI?
या नवीन CB1000F मध्ये 1,000cc, 4-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले आहे जे पूर्वी CBR1000RR फायरब्लेड (2017) मध्ये देण्यात आले होते. यात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत, ज्यात नवीन कॅमशाफ्ट, सुधारित एअरबॉक्स आणि नवीन 4-2-1 एक्झॉस्ट सिस्टम समाविष्ट आहे. हे इंजिन 123.7 hp आणि 103 Nm टॉर्क निर्माण करते. गिअरबॉक्समध्ये देखील सुधारणा करण्यात आली आहे. पहिले आणि दुसरे गिअर आता लहान आहेत, तर तिसऱ्या ते सहाव्या गिअर्सला हायवेवर बाईक अधिक आरामदायी बनवण्यासाठी लांब करण्यात आले आहे.
Honda CB1000F मध्ये CB1000 Hornet सारखाच मेन फ्रेम दिला आहे, मात्र यात नवीन सबफ्रेम डिझाइन देण्यात आले आहे. या बाईकमध्ये 795mm सीट हाइट आहे, जी Hornet पेक्षा 14mm ने कमी असून त्यामुळे ती राइड करताना अधिक आरामदायक ठरते. बाईकचे फुल टँक वजन 214 किलो आहे आणि यात 16-लीटर फ्युएल टँक देण्यात आला आहे.
सस्पेंशन सेटअपसाठी Showa कंपनीचा एडजस्टेबल सिस्टीम दिला आहे. फ्रंटमध्ये 41mm टेलिस्कोपिक फोर्क आणि रिअरमध्ये मोनोशॉक आहे. ब्रेकिंगसाठी बाईकला ड्युअल 310mm फ्रंट डिस्क आणि 240mm रिअर डिस्क ब्रेक मिळतात.
ही बाईक दिसायला जरी रेट्रो स्टाइलमध्ये असली, तरी तिचे फीचर्स पूर्णपणे मॉडर्न आणि टेक्नॉलॉजीने सुसज्ज आहेत. यात 5-इंच TFT डिस्प्ले, की-लेस इग्निशन, आणि फुल-LED लाइटिंग सिस्टम मिळते.
इलेक्ट्रॉनिक पॅकेजमध्ये तीन प्रीसेट राइडिंग मोड्स – Sport, Standard आणि Rain, तसेच दोन कस्टम मोड्स – User 1 आणि User 2 दिले आहेत. याशिवाय, बाईकमध्ये ड्युअल-चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, इंजिन ब्रेकिंग सेटिंग्स, आणि ऑप्शनल बाय-डायरेक्शनल क्विकशिफ्टर देखील उपलब्ध आहे.
Honda ने ही बाईक तीन कलर ऑप्शन्समध्ये लाँच केली आहे, Silver/Blue, Silver/Black, आणि Black/Red. जपानमध्ये या बाईकची किंमत 1,397,000 येन (सुमारे ₹8.11 लाख) ठेवण्यात आली आहे, जी CB1000 Hornet (₹7.79 लाख) पेक्षा किंचित जास्त आहे.