फोटो सौजन्य: @MahindraBolero/X.com
भारतीय बाजारात एसयूव्ही वाहनांना नेहमीच चांगली मागणी मिळताना दिसते. त्यामुळेच तर अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार परफॉर्मन्स असणाऱ्या एसयूव्ही ऑफर करत असतात. यातही Mahindra कंपनीने या सेगमेंटमध्ये आपला वेगळाच दबदबा निर्माण केला आहे. नुकतेच कंपनीने लोकप्रिय Mahindra Bolero चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले होते.
जर तुम्ही या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. चला जाणून घेऊयात, 2 लाखांचे डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला या एसयूव्हीसाठी किती EMI द्यावा लागेल.
25 वर्षांपासून मार्केट आमचंच! Mahindra Bolero आणि Bolero Neo चा नवा व्हेरिएंट लाँच, किंमत…
महिंद्रा बोलेरो ही एसयूव्ही सेगमेंटमध्ये ऑफर केली जाते. या एसयूव्हीच्या बेस व्हेरिएंटची किंमत 7.99 लाख (एक्स-शोरूम) रुपये आहे. जर तुम्ही ही एसयूव्ही दिल्लीमध्ये खरेदी केली तर तुम्हाला आरटीओ शुल्कासाठी अंदाजे 70000 आणि इंश्युरन्ससाठी 42000 द्यावे लागतील. यामुळे महिंद्रा बोलेरोची ऑन-रोड किंमत अंदाजे 9.11 लाख होईल.
जर तुम्ही या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करत असाल, तर बँकेकडून फक्त एक्स-शोरूम किमतीवरच फायनान्स केला जाईल. अशा वेळी दोन लाख रुपयांची डाउन पेमेंट केल्यानंतर उर्वरित 7.11 लाख रुपये बँकेकडून कर्ज म्हणून घ्यावे लागतील. जर बँक तुम्हाला 9 टक्के व्याजदराने सात वर्षांसाठी 7.11 लाख रुपये कर्ज देते, तर पुढील सात वर्षे दरमहा सुमारे 11,140 रुपयांचा EMI भरावा लागेल.
Mahindra ची ‘ही’ लोकप्रिय SUV तुमची झालीच म्हणून समजा! असा असेल फायनान्स प्लॅन
जर तुम्ही 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 7.11 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर सात वर्ष तुम्हाला दरमहा 11,140 रुपये EMI म्हणून द्यावा लागेल. अशा परिस्थितीत एकूण सात वर्षांत तुम्ही Mahindra Bolero साठी सुमारे 2.50 लाख रुपये व्याजाच्या स्वरूपात द्याल. त्यामुळे एक्स-शोरूम, ऑन-रोड किंमत आणि व्याज मिळून या कारची एकूण किंमत अंदाजे 11.61 लाख रुपयांपर्यंत जाईल.
महिंद्रा बोलेरो मार्केटमध्ये Kia Seltos, Maruti Grand Vitara, Hyundai Creta, आणि Honda Elevate सारख्या एसयूव्हीशी थेट स्पर्धा करते.