फोेटो सौजन्य: @horsepower (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेच जगभरातील अनेक विदेशी कंपन्या या इंडस्ट्रीत आपल्या उत्तम कार ऑफर करत आहे. यातीलच एक आघाडीची कार उत्पादक कंपनी म्हणजे होंडा.
ज्याप्रमाणे होंडाने देशात अनेक दमदार कार ऑफर केल्या आहेत. त्याचप्रमाणे, अनेक कार बंद देखील केल्या आहेत. अशीच एक कार म्हणजे Honda Civic.
ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी होंडाने जगभरात विक्रीसाठी अनेक प्रकारच्या कार उपलब्ध करून दिल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता कंपनी भारतात Honda Civic परत आणू शकते. परंतु हे वाहन सेडान म्हणून नाही तर एका खास अवतारात (Honda Civic Type R) आणण्याची तयारी सुरू आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
रिपोर्ट्सनुसार, होंडा पुन्हा एकदा सिविक कार भारतात आणू शकते. कंपनीने अद्याप याबद्दल अधिकृतपणे माहिती दिलेली नसली तरी, प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये Honda Civic Type R भारतात आणण्याची तयारी सुरू असल्याची अपेक्षा आहे.
Honda Civic Type R मध्ये कंपनीकडून 2 लिटरचे चार-सिलेंडर टर्बोचार्ज्ड इंजिन दिले जाऊ शकते. हे इंजिन कारला 325 हॉर्सपॉवर आणि 420 न्यूटन मीटर टॉर्क देईल. कारमध्ये 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणता येते. या इंजिनसह, कार फक्त 5.4 सेकंदात 0-100 किलोमीटरचा स्पीड घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड ताशी 275 किलोमीटरपर्यंत आहे.
होंडा सिविक टाइप आर मध्ये 19 इंच अलॉय व्हील्स, ट्रिपल एक्झॉस्ट, 10.2 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नऊ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, 7 एअरबॅग्ज, एबीएस, ईबीडी, हिल असिस्ट, ब्रेक असिस्ट, एलईडी लाईट्स, सनरूफ, 360 डिग्री कॅमेरा, ADAS सारखे फीचर्स देऊ शकते.
ही कार भारतात आणण्याबाबत होंडाने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु जर ती भारतात आणली गेली तर ही प्रीमियम हॅचबॅक कार फक्त CBU म्हणून दिली जाईल. अशा परिस्थितीत, या कारच्या मर्यादित युनिट्स विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतात. यामुळे, त्याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत सुमारे 55 ते 60 लाख रुपये असू शकते.
होंडा सिविक टाइप आर ही भारतीय बाजारात परफॉर्मन्स हॅचबॅक कार म्हणून लाँच केली जाऊ शकते. अशा परिस्थितीत, होंडाची सिविक थेट Volkswagen Golf GTI शी स्पर्धा करेल.