नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई; कोटीचा दंड वसूल (फोटो सौजन्य-X)
Traffic Police News in Marathi : वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं बंधनकारक असतं. परंतु बऱ्याचदा अनेकजण घाईने, अनवधाने किंवा इतर कोणत्याही कारणामुळे वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यात हयगय करतात. बाइक चालवताना काहीजण हेल्मेट न घालणं , कारमध्ये सीट बेल्ट न लावणं किंवा सिग्नलचं उल्लंघन करणं असे प्रकार अनेकांकडून होतात. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांना वाहनमालक किंवा चालकावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार असतो. अशा कारवाईदरम्यान काही पोलिसांतकडून गैरवर्तनही घडल्याची उदाहरण पाहायला मिळतात. ते कोणतीही परवानगी न घेता बाइकची चावी काढतात तर कधी विनाकारण टायरमधील हवा सोडतात. वाहतूक पोलिसांचे हे वर्तन योग्य की अयोग्य? असा अनेकांना प्रश्न पडत असेल. तसेच वाहतूक पोलिसांचा कायदा काय सांगतो? जाणून घेऊया…
जर वाहतूक पोलिस तुमच्या दुचाकीची तपासणी करताना चाव्या काढून घेतात, तर अशा परिस्थितीत तुम्हाला आश्चर्य वाटेल. वाहतूक पोलीस असे करतात अशी अनेक प्रकरणे तुम्ही पाहिली असणार. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांना असे करण्याची परवानगी आहे की नाही असा प्रश्न पडतो आणि जर असे केले तर तुम्ही काय करावे?
मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, वाहतूक पोलिसांना दुचाकीच्या चाव्या काढून घेण्याचा अधिकार नाही. अशा परिस्थितीत तुम्ही वाहतूक पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार करू शकता. विशेष परिस्थितीतच दुचाकीच्या चाव्या काढता येतात.
शांत राहा: सर्वप्रथम, शांत राहा आणि पोलीसांशी आदराने बोला. त्यांचे म्हणणे काळजीपूर्वक ऐका आणि त्यांच्या सूचनांचे पालन करा.
कारण जाणून घ्या: तुमच्या चाव्या का काढून घेतल्या गेल्या आहेत आणि तुम्ही कोणता नियम मोडला आहे हे पोलिसांना विचारा. हे जाणून घेणे महत्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही कोणती चूक केली आहे.
दंड भरा: जर तुम्ही कोणत्याही वाहतूक नियमांचे उल्लंघन केले असेल तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. तुम्हाला चलन काढावे लागेल आणि दंड भरावा लागेल.
तक्रार दाखल करा: जर तुम्हाला वाटत असेल की पोलिसांनी तुमच्या चाव्या अन्याय्य पद्धतीने काढून घेतल्या आहेत, तर तुम्ही संबंधित पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करू शकता किंवा उच्च अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.