फोटो सौजन्य: @TusharG98540565 (X.com)
भारतीय मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हीच वाढती मागणी, अनेक ऑटो कंपन्यांना Electric Car उत्पादित करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. ग्राहक देखील पर्यावरण पूरक असणाऱ्या इलेक्ट्रिक कार्सना चांगला प्रतिसाद देत आहे. सध्या दमदार Evs ऑफर करण्यात Tata Motors आघाडीवर आहे. कंपनी लवकरच मार्केटमध्ये Tata Harrier EV देखील लाँच करणार आहे.
जानेवारी 2025 मध्ये भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 हा ऑटो कार्यक्रम लाँच करण्यात आला होता. यामध्ये अनेक ऑटो कंपन्यांनी दमदार कार्स सादर केल्या होत्या. मात्र, सर्वांच्या नजरा टाटा मोटर्सच्या कारवर खिळल्या होत्या. अशातच टाटाने त्यांची आगामी इलेक्ट्रिक कार Tata Avinya सादर केली. या कारचाच लूक इतका जबरदस्त आहे की भल्याभल्या लक्झरी कार याच्या समोर फिक्या पडतील. मात्र, Tata Avinya चे लाँचिंग लांबणीवर पडले आहे.
Steelbird कडून Half Face Design Helmets लाँच, कमी किमतीत मिळणार उत्तम सेफ्टी
टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीचे मुख्य व्यावसायिक अधिकारी विवेक श्रीवत्स यांनी पुष्टी केली की कंपनी 2027 मध्ये Avinya कार लाँच करण्याची तयारी करत आहे. याचा अर्थ असा की पहिले Avinya मॉडेल किमान दोन वर्षे उशिराने येणार आहे.
टाटाने 2022 मध्ये पहिल्यांदा Avinya Concept प्रदर्शित केली. तेव्हा कंपनीचे उद्दिष्ट होते की 2025 मध्ये हे कार लाँच व्हावी. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीला माहिती मिळाली आहे की Avinya EV येत्या 2027 साली येणार आहे.
Avinya ईव्ही लाँच करण्यासाठी, टाटा मोटर्सने जॅग्वार लँड रोव्हरसोबत नंतरच्या ईएमए आर्किटेक्चरची देवाणघेवाण करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. परंतु तामिळनाडूमधील जॅग्वार लँड रोव्हरच्या स्थानिक उत्पादन प्रकल्पाला विलंब होत असल्याने, आता टाटा मोटर्स वेगाने पर्यायी उपाय शोधत आहे. यामध्ये ईएमए आर्किटेक्चरची कमी किमतीचे व्हर्जन किंवा ग्रुपच्या बाहेरून सोर्सिंग आर्किटेक्चरचा समावेश आहे.
टाटाच्या सर्व लेटेस्ट ईव्ही आयसीई प्लॅटफॉर्मवर (Gen 2 अॅक्टी.ईव्ही आर्किटेक्चर) आधारित असताना, आगामी Sierra EVसह, अविना मॉडेल्स जनरेशन 3 स्केटबोर्ड बॉर्न-इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म वापरणारे पहिल्या कार असतील. हे फ्लॅट फ्लोअर, ऑप्टिमाइज्ड केबिन पॅकेजिंग आणि रॅडिकल स्टाइलिंग सक्षम करेल.