होंडासाठी May 2025 ठरला खास ! कधी नव्हे अशी केली रेकॉर्डब्रेक विक्री
होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (HMSI) ने May 2025 महिन्याचे विक्री आकडे जाहीर केले. कंपनीची एकूण विक्री यावर्षीच्या मे महिन्यात 4,65,115 युनिट्स इतकी झाली आहे. यामध्ये 4,17,256 युनिट्स घरगुती विक्री असून 47,859 युनिट्स निर्यातीमध्ये आहेत. ही कामगिरी HMSI च्या स्थिर आणि विस्तारित वितरण नेटवर्कमुळे साध्य झाली आहे.
एप्रिल 2025 ते मे 2025 या YTD FY26 कालावधीत कंपनीची एकूण विक्री 9,45,979 युनिट्सवर पोहोचली आहे. यात 8,40,155 युनिट्स घरगुती बाजारात विकण्यात आले असून, 1,05,824 युनिट्स निर्यात करण्यात आले आहेत.
HMSI ने आपल्या प्रीमियम मोटरसायकल श्रेणीत नवचैतन्य आणले आहे. कंपनीने Rebel 500, X-ADV, CB750 Hornet, CB1000 Hornet SP आणि Gold Wing Tour च्या 50व्या वर्धापनदिन विशेष आवृत्तीचे उद्घाटन केले. तसेच, CB650R आणि CBR650R या बाइक्सच्या E-Clutch एडिशनची विक्री भारतात सुरू झाली आहे. यामुळे HMSI च्या बिगविंग पोर्टफोलिओला बळकटी मिळाली आहे.
लवकरच लाँच होणार Maruti ची बहुचर्चित इलेक्ट्रिक कार ! फीचर्स असे की कार खरेदी करण्यासाठी रांग लावाल
होंडाने आपल्या 500 मिलियन मोटरसायकलचे उत्पादन पूर्ण करत एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 1949 मध्ये सुरू झालेल्या ‘ड्रीम D-Type’ या पहिल्या मास-प्रोड्युस्ड मोटरसायकलला यावर्षी 76 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने कंपनीने विथलापूर येथील कारखान्यात नवीन उत्पादन ओळ सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे भारतातील उत्पादन क्षमतेत वाढ होणार आहे.
HMSI ने रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी भारतातील 13 ठिकाणी विशेष मोहिमा राबवल्या. महाराष्ट्रातील जलगाव, कोल्हापूर, झारखंडमधील हजारीबाग, उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि कानपूर, राजस्थानमधील कोटपुतली, हरियाणातील फरीदाबाद, गुजरातमधील वडोदरा, तमिळनाडूमधील तंजावूर आणि चेंगलपट्टू, पंजाबमधील पटियाला, बिहारमधील भागलपूर आणि आंध्र प्रदेशातील कदप्पा येथे हे उपक्रम पार पडले. तसेच, हैदराबादमधील ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कमध्ये समर कॅम्प घेण्यात आला, ज्यामध्ये लहान मुलांमध्ये रस्ता सुरक्षा वर्तनाचे शिक्षण देण्यात आले.
500 KM ची रेंज, हायटेक फीचर्स आणि बरंच काही ! उद्या लाँच होणार Tata Harrier EV
CASTROL होंडा LCR राइडर जोहान झार्कोने आपल्या 150व्या MotoGP रेसमध्ये फ्रेंच GP जिंकत ऐतिहासिक विजय मिळवला. त्याचप्रमाणे, लुका मारीनीनेही मजबूत कामगिरी करत टॉप 10 जवळ पोहोचला. या विजयामुळे होंडाची RC213V पुन्हा एकदा यशाच्या शिखरावर पोहोचली आहे.