होंडाच्या विक्रीत वाढ
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने 5,15,378 युनिट्स विक्री केल्याची नोंद केली आहे. यामध्ये 4,66,331 युनिट्स देशांतर्गत विक्री झाली असून 49,047 युनिट्स निर्यात करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, जून 2025 च्या तुलनेत जुलैमध्ये HMSI च्या एकूण विक्रीत 20% वाढ झाली आहे.
वित्तीय वर्ष 2025-26 (एप्रिल ते जुलै 2025) या कालावधीत, कंपनीने एकूण 18,88,242 युनिट्स विकल्या असून यामध्ये 16,93,036 युनिट्स देशांतर्गत विक्री आणि 1,95,206 युनिट्स निर्यात यांचा समावेश आहे.
‘या’ इलेक्ट्रिक कारने बनवला Guinness World Record, सिंगल चार्जमध्ये 1,205km धावणारी पहिली EV Car
जुलै 2025 मधील HMSI ची महत्त्वाची वैशिष्ट्ये
HMSI ने रस्ते सुरक्षेच्या आपल्या बांधिलकीला पुढे नेत देशभरातील 13 शहरांमध्ये जनजागृती मोहिमा राबवल्या आहेत, यामध्ये सोनिपत, सांगली, कटक, हाथरस, रोहरू, उदयपूर, भावनगर, झाशी, त्रिशूर, बीड, हैदराबाद, मैसूर आणि कांठई यांचा समावेश होता. या उपक्रमांचा मुख्य उद्देश तरुणांना जबाबदारीने वाहन चालवणे, सुरक्षित प्रवासाचे नियम आणि रस्त्यावरील शिस्त यांची माहिती देणे होता. याशिवाय, लुधियाना येथील ट्रॅफिक ट्रेनिंग पार्कच्या (TTP) नवव्या वर्धापन दिनानिमित्त HMSI ने रस्ते सुरक्षा आणि ट्रॅफिक शिस्त यावरचा आपला फोकस अधिक बळकट केला.
सीएसआरमधील काम
होंडा इंडिया फाउंडेशनने (एचआयएफ) युवक सशक्तीकरण आणि डिजिटल शिक्षणाच्या दिशेने आपली बांधिलकी अधिक मजबूत करत मिजोराममध्ये ‘प्रोजेक्ट बुनियाद – आत्मनिर्भरतेचा आधार’ या उपक्रमाचा पुढचा टप्पा सुरू केला. हा उपक्रम आयझॉलमधील मिजोराम युवा आयोगाच्या कार्यालयात सुरू करण्यात आला.
या अंतर्गत, एचआयएफने मिजोराम युवा आयोगाच्या डिजिटल शिक्षण प्रणालीच्या सुधारणेसाठीही पाठिंबा दिला. याच उपक्रमाचा विस्तार करत एचआयएफने सिक्कीम सरकारच्या कौशल्य विकास विभागाच्या हस्तकला प्रशिक्षण व योजना संचालनालयासोबत सामंजस्य करार केला. या करारामुळे जागतिक बँकेच्या पाठिंब्याने राबवण्यात येणाऱ्या ‘सिक्कीम इंस्पायर्स कार्यक्रमा’अंतर्गत सिक्कीममध्येही ‘प्रोजेक्ट बुनियाद’ची सुरुवात झाली असून, आत्मनिर्भरतेसाठी आवश्यक मूलभूत कौशल्ये निर्माण करण्याच्या एचआयएफच्या उद्दिष्टाला अधिक बळ मिळणार आहे.
Fancy Doors असणाऱ्या MG Cyberster चा पहिला रिव्ह्यू? लुकपासून ते फिचर्सपर्यंत जाणून घ्या एका क्लिकवर
होंडाचे उत्पादन
भारतात एचएमएसआयने आपल्या २५ व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून दोन नव्या दुचाकींचा शुभारंभ केला ज्यामध्ये सीबी१२५ हॉर्नेट आणि शाईन १०० डीएक्सचा समावेश आहे. शहरी तरुणांसाठी खास तयार केलेली सीबी१२५ हॉर्नेट ही आधुनिक वैशिष्ट्यांनी समृद्ध असून रस्त्यावरील आकर्षक डिझाईन आणि जोशपूर्ण कामगिरी यांचा उत्तम संगम आहे. शाईन मालिकेची परंपरा पुढे नेत, शाईन १०० डीएक्स ही नव्या युगातील किफायतशीरतेला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांसाठी सुसज्ज स्वरूपात सादर करण्यात आली आहे. या दोन्ही दुचाकींसाठी नोंदणी सुरु झाली असून ग्राहकांना होंडाच्या नव्या तंत्रज्ञानाचा अनुभव घेण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.
मोटरस्पोर्ट्समध्येही पुढे
जुलै २०२५ मध्ये जर्मनी आणि झेक प्रजासत्ताक येथे मोटो जीपी स्पर्धा पार पडली. तसेच, जपानमध्ये पार पडलेल्या २०२५ एफआयएम आशिया रोड रेसिंग अजिंक्यपदाच्या तिसऱ्या फेरीत IDEMITSU होंडा रेसिंग इंडियाच्या रायडर्सनी आपल्या कामगिरीची परंपरा कायम राखली. आशिया प्रॉडक्शन २५०सीसी वर्गात, केविन क्विंटल आणि योहान रीव्ह्स यांनी पहिल्या शर्यतीत अनुक्रमे १५व्या आणि २४व्या क्रमांकाने, तर दुसऱ्या शर्यतीत ३१व्या आणि २५व्या स्थानावर शर्यत पूर्ण केली.