Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

होंडा QC3 आणि टीव्हीएस iQube 3.1 kWh या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जवळपास सारखी आहे. पण होंडा QC3 दावा केलेल्या रेंजमध्ये 22km पुढे आहे, तर iQube मध्ये 3.1kWh बॅटरी आणि 4.4kW मोटर मिळते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 27, 2026 | 05:44 PM
Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या
Follow Us
Follow Us:
  • होंडा QC3 ची किंमत टीव्हीएस iQube पेक्षा फक्त ₹1,127 ने कमी असून दोन्ही जवळपास समान बजेटमध्ये येतात.
  • होंडा QC3 ची दावा केलेली 145km रेंज टीव्हीएस iQube च्या 123km रेंजपेक्षा 22km जास्त आहे.
  • टीव्हीएस iQube मध्ये 4.4kW मोटर, 3.1kWh बॅटरी आणि 82kph टॉप स्पीड मिळतो.
इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये कुटुंबासाठी वापरता येणाऱ्या मॉडेल्सची मागणी या वर्षात जरा जास्तच वाढत आहे. पेट्रोलचे वाढते दर आणि पर्यावरणपूरक वाढता कल यांमुळे इलेक्ट्रिक स्कूटरची हवा सगळीकडे वाढत चालली आहे. याच सेगमेंटमध्ये नुकतीच लौच झालेली होंडा QC3 आणि टीव्हीएस iQube 3.1 kWh हे दोन तुफानी पर्याय ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दोन्ही स्कूटरची किंमत जवळपास समान असली तरी बॅटरी, रेंज, डिझाइन आणि फीचर्समध्ये काही महत्त्वाचे फरक आहेत. चला ते पाहून घेऊयात.

किंमत फरक

किंमतीपासून सुरुवात केली तर होंडा QC3 ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत ₹1,35,000 आहे. टीव्हीएस iQube 3.1 kWh ची किंमत ₹1,36,127 आहे. म्हणजेच होंडा QC3 ही फक्त ₹1,127 ने स्वस्त आहे. त्यामुळे सुरुवातीच्या बजेटच्या दृष्टीने दोन्ही स्कूटरमध्ये फार मोठा फरक नाही.

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये

बॅटरी आणि टेक्निकल फीचर्स

होंडा QC3 मध्ये 3.0kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीने याची IDC रेंज 145km असल्याचा दावा केला आहे. स्कूटरला 5-इंच TFT डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल आणि SMS अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन तसेच स्मार्ट की मिळते. लांब सीट आणि मोठा फ्लोअरबोर्ड यामुळे दैनंदिन वापरासाठीही योग्य ठरू शकते.

दुसरीकडे, टीव्हीएस iQube 3.1 kWh मध्ये 4.4kW हब मोटरसह 3.1kWh बॅटरी मिळते. याची IDC रेंज 123km असून टॉप स्पीड 82kph आहे. स्टँडर्ड चार्जरच्या मदतीने 0-80% चार्जिंगसाठी 4 तास 30 मिनिटे लागतात. यात Eco आणि Power असे 2 राइडिंग मोड आहेत. 5-इंच TFT डिस्प्लेसोबत कनेक्टिव्हिटी फीचर्सही मिळतात.

Honda QC3 इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च; 145 km रेंज, किंमत फक्त Rs. 1.35 लाख

ब्रेकिंगसाठी दोन्ही स्कूटरमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक देण्यात आला आहे. टीव्हीएस iQube मध्ये 220mm फ्रंट डिस्क आणि 130mm रिअर ड्रम ब्रेक आहे, तर होंडा QC3 मध्ये फ्रंट डिस्क आणि रिअर ड्रम सेटअप मिळतो. त्यामुळे ग्राहकांसाठी निवड करताना किंमतीसोबत रेंज, चार्जिंग वेळ आणि दैनंदिन वापराच्या गरजा लक्षात घेणे महत्त्वाचे ठरते.

Web Title: Honda qc3 vs tvs iqube price range features comparison auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooters
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!
1

यामाहा RD350LC चालवली अन् कळली जुन्या बाइकची खरी ‘फील’ काय असते!

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी
2

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी

Keeway EZI Hypevolt-R इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय? मग नक्की जाणून घ्या हे ३ फायदे आणि २ तोटे
3

Keeway EZI Hypevolt-R इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय? मग नक्की जाणून घ्या हे ३ फायदे आणि २ तोटे

एप्रिल ते ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत ४५०% ची विक्रमी वाढ! टीव्हीएस, बजाज अन् एथर मोठ्या फार्मात
4

एप्रिल ते ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत ४५०% ची विक्रमी वाढ! टीव्हीएस, बजाज अन् एथर मोठ्या फार्मात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.