
डिझाइन आणि लूक
होंडा शाइन 100 डीएक्सचे डिझाइन रोजच्या वापरावर केंद्रित आहे. बाइकला रुंद फ्यूल टँक आणि नवीन ग्राफिक्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे तिचा लूक साध्या कम्यूटर बाइकपेक्षा अधिक आकर्षक दिसतो. ही बाइक Imperial Red Metallic, Pearl Igneous Black, Athletic Blue Metallic आणि Geny Gray Metallic अशा 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे.
Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
डिजिटल मीटरसह उपयोगी फीचर्स
शाइन 100 डीएक्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल. यामध्ये डिस्टन्स टू एम्प्टी, सरासरी आणि लाइव्ह मायलेज तसेच सर्व्हिस इंडिकेटरसारखी माहिती पाहता येते. याशिवाय लांब आणि आरामदायी सीट, सेल्फ तसेच किक स्टार्ट, ट्यूबलेस टायर आणि अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कमी टर्निंग रेडियसमुळे शहरातील गर्दी आणि अरुंद रस्त्यांवर बाइक हाताळणे सोपे जाते.
सेफ्टी आणि हार्डवेअर
सुरक्षेसाठी बाइकला कॉम्बी ब्रेक सिस्टम म्हणजेच CBS आणि साइड-स्टँड इंजिन कट-ऑफ देण्यात आला आहे. पुढील बाजूस 130 mm आणि मागील बाजूस 110 mm ड्रम ब्रेक मिळतात. बाइकचे वजन 103 kg असून, त्यामुळे नव्या रायडर्सनाही ती सहज नियंत्रित करता येऊ शकते.
100cc इंजिन किती पावरफुल?
होंडा शाइन 100 डीएक्समध्ये 98.98cc सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक इंजिन असून ते 4-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे इंजिन 7,500 rpm वर 7.38 PS पॉवर आणि 5,000 rpm वर 8.05 Nm टॉर्क तयार करते. हलके वजन आणि स्मूथ पॉवर डिलिव्हरीमुळे रोजच्या ऑफिस प्रवासासाठी ही बाइक व्यावहारिक ठरते. कमी किंमत, साधे मेंटेनन्स आणि शहरातील वापरासाठी आवश्यक फीचर्स यामुळे बजेट कम्यूटर सेगमेंटमध्ये ती लक्षवेधी पर्याय आहे.