फोटो सौजन्य: @OutbackMototek (X.com)
भारतात बजेट फ्रेंडली बाईक्सच्या विक्रीत नेहमीच मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. मात्र, असे जरी असले तरी मार्केटमध्ये हाय परफॉर्मन्स बाइकची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक तरुणांचे स्वप्न असते की त्यांच्याकडे स्टायलिश लूक आणि हाय परफॉर्मन्स देणारी बाईक हवी. हेच स्वप्न सत्यात उतरण्यासाठी अनेक जण दिवसरात्र कष्ट करत असतात. अशातच जर तुम्ही सुद्धा एका हाय परफॉर्मन्स आणि स्टायलिश बाईकच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
अलिकडेच होंडा टू व्हीलरने ग्लोबल लेव्हलवर अपडेटेड होंडा ट्रान्सल्प 750 सादर केली आहे. आता कंपनीने भारतात त्याचे लाँचिंग निश्चित केले आहे. कंपनी जून-जुलै 2025 मध्ये भारतात ही बाईक लाँच करू शकते. यात अनेक उत्तम फीचर्स असणार आहे. कंपनी ही बाईक तिच्या बिगविंग शोरूमद्वारे विकेल. Honda Transalp 750 कोणत्या फीचर्ससह लाँच केली जाणार आहे, त्याबद्दल जाणून घेऊया.
नव्या रंगरूपात लाँच झाली KTM RC 200, इंजिन सुद्धा झाले अपडेट
होंडा ट्रान्सल्प 750 मध्ये आधुनिक बाय-एलईडी हेडलॅम्प सेटअप देण्यात आला आहे, जो बाईकला स्टायलिश लूक प्रदान करतो. या नव्या मॉडेलमध्ये मध्यभागी एअर डक्ट असलेली सुधारित विंडस्क्रीन आहे, जे रायडर्सचा प्रवास अधिक आरामदायी होतो.
सस्पेंशनमध्ये देखील महत्त्वाचे बदल झाले आहेत. जसे की समोरील बाजूस सुधारित डॅम्पिंग तर मागच्या बाजूस अधिक मजबूत शॉक अॅब्झॉर्बर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे खराब रस्त्यावर देखील राइड अधिक स्थिर आणि सुसह्य होते. नवीन ट्रान्सल्प ७५० तीन आकर्षक रंगसंगतींमध्ये सादर केली जाईल – रोझ व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक आणि पर्ल डीप मड ग्रे.
या बाईकमध्ये पूर्वीचेच 755 सीसी पॅरलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे, जे 91.7 एचपी पॉवर आणि 75 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन शहरातील दैनंदिन वापरासाठी तसेच लांब पल्ल्याच्या टुरिंगसाठी योग्य आहे. याशिवाय, ऑफ-रोड अॅडव्हेंचर साठीही हे इंजिन सक्षम मानले जाते.
कहरच ! 15 लाखांच्या किमतीत फक्त 2 लोकांसाठीच बनवली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार
होंडा ट्रान्सल्प 750 भारतात CBU (Completely Built Unit) मार्गे आयात केली जाणार असून, ती फक्त होंडाच्या बिगविंग टॉपलाइन डीलरशिपद्वारे विकली जाईल. ही अॅडव्हेंचर टूरर बाईक भारतात 2025 च्या जून-जुलै महिन्यांदरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. याची अपेक्षित एक्स-शोरूम किंमत सुमारे ₹10.99 लाख असेल.
नवीन ट्रान्सल्प 750 ही बाईक त्याच्या आधुनिक फीचर्ससह, जबरदस्त लूक आणि कार्यक्षम इंजिनसह अॅडव्हेंचर बाइकप्रेमींना एक उत्कृष्ट पर्याय ठरणार आहे.