फोटो सौजन्य: @TimPollardCars (X.com)
भारतासह जगभरात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. चांगली रेंज आणि मेंटेनन्स कॉस्ट कमी असल्याने देखील इलेक्ट्रिक वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच ग्लोबल मार्केटमध्ये बजेट फ्रेंडली ते महागड्या इलेक्ट्रिक कार्सचा समावेश आहे. अशातच आज आपण अशा एका इलेक्ट्रिक कारबद्दल जाणून घेणार आहोत, जी फक्त 2 प्रवाशांसाठी बनवण्यात आली आहे. तसेच याची किंमत देखील जास्त ठेवण्यात आली आहे. चला या अनोख्या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
मायक्रोलिनो ही एक अनोखी दोन सीटर इलेक्ट्रिक कार आहे जी पहिल्यांदा सुमारे 8 वर्षांपूर्वी सादर करण्यात आली होती. तेव्हापासून युरोपियन रस्त्यांवर ही कार चर्चेचा विषय बनली आहे. या कारचे डिझाइनच आकर्षक आहेतच पण याव्यतिरिक्त ही कार इंस्टाग्राम रील्समुळे वारंवार दिसते.
‘या’ 5 दिमाखदार फीचर्समुळेच Tata Altroz facelift चा पगडा इतर गाड्यांवर भारी
अलीकडेच या कारचा नवीन व्हेरियंट Microlino Spiaggina सादर करण्यात आले आहे, ज्यामध्ये रेट्रो लूक आणि मॉडर्न टेक्नॉलजीचा अद्भुत मिलाफ दिसून येतो. त्याचे खास फीचर्स म्हणजे ही कार प्रत्यक्षात नॉर्मल कार नसून L7e कॅटेगरीमधील क्वाड्रिसायकल आहे.
मायक्रोलिनो ही युरोपमध्ये क्वाड्रिसायकल कॅटेगरीमध्ये येते, ज्यामुळे ती पॅसेंजर कारपेक्षा कमी नियमांनुसार नोंदणीकृत होऊ शकते. ही कार 90 किमी/ताशी वेग गाठू शकते. याचे प्रोडक्शन चेसिस ऑटोमोटिव्ह-ग्रेड डिझाइनवर आधारित आहे आणि त्यात वापरलेली रचना सुरक्षित कॉकपिटचा अनुभव देते. नवीन स्पियागिना व्हर्जन ओपन-टॉप डिझाइनसह येते, ज्यामध्ये बाजूच्या आणि मागील खिडक्या काढून टाकल्या आहेत आणि आवश्यक असल्यास फॅब्रिक कॅनोपी देखील स्थापित केली जाऊ शकते.
मायक्रोलिनो 12.5 किलोवॅट क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटरने चालते, ज्यामुळे ही कार 90 किमी/ताशी कमाल वेग मिळवू शकते. यासोबतच, यात 10.5 किलोवॅट क्षमतेची बॅटरी आहे, जी एका चार्जवर 177 किमी पर्यंतची रेंज देते. चार्जिंगसाठी, त्यात 2.2 किलोवॅटचा चार्जर आहे, त्यामुळे तो कोणत्याही घरगुती आउटलेटवरून सहजपणे चार्ज करता येतो. त्याच वेळी, जर हाय-पॉवर चार्जर वापरला तर ही कार 2 ते 4 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते.
लय वाईट ! ‘या’ कंपनीच्या विक्रीला उतरती कळा, अनुभवली 12 वर्षातील सर्वात मोठी घसरण
मायक्रोलिनोच्या बेस मॉडेलची किंमत युरोपमध्ये €17,000 (नडजे $19,000 किंवा 15.7 लाख रुपये) पासून सुरू होते. ही कार तिच्या प्रीमियम लूक आणि स्विस डिझाइनमुळे एक स्टाइल स्टेटमेंट बनली आहे. जरी किंमत बजेटपेक्षा थोडी जास्त असली तरी, ती अजूनही प्रेक्षकांसाठी एक अनोखी कार आहे. कंपनीकडे अधिक परवडणारे मॉडेल देखील उपलब्ध आहेत.