फोटो सौजन्य: @CarReviewExpert (X.com)
भारतीय बाजारात अनेक लक्झरी कार्स पाहायला मिळतात, ज्या कोट्यवधी रुपयांमध्ये विकल्या जातात. मात्र प्रत्येकजण अशा महागड्या कार्स खरेदी करू शकत नाही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, या महागड्या कार्स विकून कार कंपन्यांना किती नफा होतो? तुमचा विचार असेल की कंपनी करोडोंचा नफा कमावते, पण प्रत्यक्षात चित्र याच्या अगदी उलटच आहे.
हे वाचून आश्चर्य वाटेल, पण टोयोटा फॉर्च्यूनर ही अशी कार आहे ज्यावरून कंपनीपेक्षा सरकार जास्त पैसे कमावते. एका वेबसाइटनुसार, सध्या टोयोटा फॉर्च्यूनरच्या 4X2 AT (पेट्रोल) व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत सुमारे 36.05 लाख रुपये आहे, तर टॉप व्हेरिएंट GR S 4X4 डिझेल AT ची किंमत 62.34 लाख रुपये इतकी आहे.
एकटी स्कूटर Jupiter, Access आणि Chetak सारख्या स्कूटरवर भारी, फक्त 1 महिन्यात मिळवले 1.83 नवे ग्राहक
2022 मध्ये यूट्यूबर आणि चार्टर्ड अकाउंटंट साहिल जैन यांनी त्यांच्या व्हिडीओत सांगितले होते की, जर फॉर्च्यूनरच्या एखाद्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 39.28 लाख रुपये असेल, तर त्यात कारची मूळ किंमत केवळ 26.27 लाख रुपये आहे. उर्वरित रक्कम ही विविध टॅक्समुळे वाढते.
या टॅक्समध्ये प्रमुख म्हणजे 28% जीएसटी आणि 22% सेस (GST Compensation Cess). म्हणजेच, या कारवर एकूण 50 टक्क्यांहून अधिक टॅक्स आकारले जाते. उदाहरणार्थ, वरील मॉडेलवर 7.28 लाख रुपये जीएसटी आणि 5.72 लाख रुपये सेस असे मिळून 13 लाख रुपये केवळ केंद्र सरकारला टॅक्स स्वरूपात दिले जातात.
भारतात सादर झाली Honda Shine 100 DX, मिळणार असा मायलेज ज्याचा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल
याव्यतिरिक्त काच्या किंमतीत Registration Charges, लॉजिस्टिक खर्च, फास्टॅग, आणि इन्शुरन्स यांसारखे अतिरिक्त शुल्कही जोडले जाते. जर डिझेल व्हेरिएंट असेल, तर ग्रीन टॅक्स देखील द्यावा लागतो. या सर्वांचा विचार केला असता, एकूण 18 लाख रुपयांहून अधिक रक्कम सरकारच्या तिजोरीत जाते.
या सगळ्या प्रक्रियेतून हे स्पष्ट होते की, लक्झरी कार्स सरकार जास्त कमावते. कंपनीला तुलनेने कमी नफा मिळतो. डीलर्सना मात्र या कार्सवर अधिक कमिशन मिळते. त्यामुळे फॉर्च्यूनरसारख्या गाड्या विकल्या गेल्या की, ग्राहकांनी मोठी रक्कम फक्त सरकारला कर म्हणून द्यावी लागते, हे विसरून चालणार नाही.