फोटो सौजन्य: @carandbike (X.com)
भारतीय बाजारात अनेक उत्तम बाईक ऑफर होत असतात. यातही बजेट फ्रेंडली आणि उत्तम मायलेज देणाऱ्या बाईकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार बाईक ऑफर करत असतात. होंडाने टू-व्हीलर सेगमेंटमध्ये उत्तम बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत.
भारतीय बाजारात होंडा टू-व्हीलर्सने Honda Shine 100 DX सादर केली आहे. कंपनीने 100 सीसी सेगमेंटला आणखी मजबूत करण्यासाठी ही बाईक आणली आहे. कंपनीने मायलेज, उत्तम तंत्रज्ञान आणि स्टायलिश डिझाइन अशा अनेक उत्तम फीचर्ससह ही बाईक बाजारात आणली आहे. चला जाणून घेऊया या बाइकमध्ये काय खास असेल आणि ती भारतात कोणत्या उत्तम फीचर्ससह सादर करण्यात आली आहे.
पेट्रोलचं नो टेन्शन! 60 हजारांहून कमी किमतीत मिळतात या 5 ई-स्कूटर, एकापेक्षा एक जबरदस्त फीचर्स
Honda Shine 100 DX ही अतिशय चांगल्या डिझाइनसह लाँच करण्यात आली आहे. यात नवीन एरो टाइपचा फ्युएल कॅप आणि रुंद फ्युएल टॅंक आहे. यासोबतच क्रोम फिनिश केलेले मफलर, हँडलबार, किक आर्म, गियर शिफ्ट पॅडल आणि व्हिझर देखील उपलब्ध आहेत. इतकेच नाही तर डायनॅमिक ग्राफिक्स, एलिगंट टेल लॅम्प आणि एरोडायनामिक फ्रंट काऊल देखील देण्यात आले आहे. Shine 100 DX पर्ल ब्लॅक, रेड मेटॅलिक, ग्रे मेटॅलिक, ॲथलेटिक ब्लू या चार रंगांच्या पर्यायांमध्ये आणण्यात आली आहे.
शाइन 100 डीएक्समध्ये 98.98cc सीसी एअर-कूल्ड, 4-स्ट्रोक एसआय इंजिन वापरले आहे, जे 5.43 किलोवॅट पॉवर आणि 8.04 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 4-स्टेप गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. त्यात होंडाची ईएसपी टेक्नॉलजी आणि पीजीएम-एफआय सिस्टम आहे, जी इंजिनला अधिक कार्यक्षम आणि स्वच्छ बनवते.
तसेच, ACG स्टार्ट मोटर देण्यात आली आहे, जी कोणत्याही गियर नॉइजशिवाय सायलेंट स्टार्ट देते. पिस्टन कूलिंग जेट, ऑफसेट सिलेंडर आणि रॉकर रोलर आर्म देखील देण्यात आले आहेत, जे इंजिनचे फ्रिक्शन कमी करतात आणि अधिक मायलेज देतात.
Toyota Fortuner वर शासन किती लावते Tax? आकडा वाचून विश्वासच बसणार नाही
या बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल मीटर इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. ही बाईक साधारण मायलेज, रिअल टाइम फ्युएल रिडींग, डिजिटल घड्याळ आणि सर्व्हिस रिमाइंडर यासारख्या गोष्टींबद्दल माहिती देते. यात 10 लिटरचे रुंद फ्युएल टॅंक आहे. बाईकमध्ये हॅलोजन बल्ब हेडलाइट आहे.
प्रवाशांच्या आरामदायी प्रवासासाठी, होंडा शाइन 100 डीएक्समध्ये 677 मिमी लांब आणि कुशन असलेली सीट, 5-स्टेप ॲडजस्टेबल रिअर सस्पेंशन, ट्यूबलेस टायर्ससह अलॉय व्हील्स, कॉम्बी ब्रेक सिस्टम (सीबीएस) आणि साइड स्टँड इंजिन इनहिबिटर अशी सेफ्टी फीचर्स देण्यात आली आहेत. याच्या पुढच्या टायरमध्ये 130 मिमी ड्रम आणि मागील टायरमध्ये 100 मिमी ड्रम ब्रेक आहे. त्याचा ग्राउंड क्लीयरन्स 168 मिमी आणि लांब व्हीलबेस 1245 मिमी आहे.