फोटो सौजन्य: iStock
भारतीय Automobile मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांचे वारे जोरात वाहू लागले आहे. आजचा वाहन खरेदीदार कार खरेदी करताना इंधनावर चालणाऱ्या कारपेक्षा इलेक्ट्रिक कारकडे जास्त लक्ष देत असतो. तसेच आगामी काळात इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत वाढ होणार असल्याची चिन्ह दिसल्यामुळे अनेक ऑटो कंपन्या दमदार इलेक्ट्रिक कार ऑफर करत आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रेंज. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक कार ऑफर करताना त्यांची रेंज 400 किमी पेक्षा जास्त ठेवतात. पण बहुतेक लोकांना हे माहित नसते की त्यांच्या निष्काळजीपणामुळे कारची रेंज कमी होते. चला जाणून घेऊयात कोणत्या चुकांमुळे इलेक्ट्रिक कारची रेंज कमी होते?
जर तुम्ही कार अशा ठिकाणी पार्क करता, जिथे सूर्यप्रकाश थेट कारवर पडतोय, तर त्यामुळे वाहनाचे तापमान खूप वाढते. दीर्घकाळ असे केल्याने त्याच्या बॅटरीवरही वाईट परिणाम होतो आणि परिणामी रेंज कमी होते. त्यामुळे शक्यतो कार कव्हर्ड पार्किंगमध्ये किंवा सावलीत उभी करा, जेणेकरून थेट सूर्यप्रकाश कारवर पडणार नाही.
Royal Enfield ची ‘ही’ बाईक झाली अपडेट, नव्या फीचर्ससह लवकरच होणार लाँच
प्रवासादरम्यान अनेकदा लोक आपली इलेक्ट्रिक कार पटकन चार्ज करण्यासाठी फास्ट चार्जरचा वापर करतात. पण बॅटरीचे आयुष्य वाढवायचे असेल आणि चांगली रेंज हवी असेल, तर कार नेहमी नॉर्मल चार्जरने चार्ज करा. फास्ट चार्जरपेक्षा नॉर्मल चार्जरने चार्ज करायला जास्त वेळ लागतो, पण त्यामुळे बॅटरीची परफॉर्मन्स व रेंज सुधारते.
उन्हाळ्यात इलेक्ट्रिक कार पूर्णपणे चार्ज करणे टाळावे. असे केल्याने बॅटरीवर ताण येतो. तज्ज्ञांच्या मते, जर कारमध्ये बॅटरी 10% शिल्लक असताना चार्जिंग सुरू करून ती 80% पर्यंत चार्ज केली, तर बॅटरीचे आयुष्य वाढते आणि रेंजही सुधारते.
Studds कडून हाफ फेस हेल्मेटची नवी Vogue Series लाँच, आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षा
उन्हाळ्यात इलेक्ट्रिक कारची रेंज चांगली ठेवण्यासाठी अचानक स्पीड वाढवणे टाळा. त्याचप्रमाणे, वारंवार अचानक ब्रेक मारल्यानेही कारची रेंज कमी होते. त्यामुळे कार चालवताना स्पीड हळूहळू वाढवा. तसेच ब्रेकही संयमाने वापरा. आजकाल बहुतेक कारमध्ये रीजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी दिलेली असते, ज्यामुळे ॲक्सेलरेटर सोडल्यानंतर बॅटरी आपोआप चार्ज होते आणि रेंज वाढण्यास मदत मिळते.