Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Renault ची Electric Car म्हणजे फक्त रफ्तारsss! सिंगल चार्जवर पार केले 1,008 किमीचे अंतर

Renault च्या इलेक्ट्रिक कारची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. नुकतेच या कारने पूर्ण चार्जवर तब्बल 1,008 किमीचे अंतर पार केले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 31, 2025 | 08:33 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • रेनॉल्ट कारचा जलवा
  • सिंगल चार्जवर दिली 1,008 किमीची रेंज
  • जाणून घ्या या कारबद्दल
इलेक्ट्रिक वाहनांच्या रेंजविषयी ग्राहकांच्या मनात नेहमीच प्रश्न असतो. अनेकजण विचारतात की एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर इलेक्ट्रिक कार प्रत्यक्षात किती किमीचे अंतर पार करू शकते. Renault ने या प्रश्नाचे प्रभावी उत्तर आपल्या Filante Record 2025 या डेमो कारच्या माध्यमातून दिले आहे. या इलेक्ट्रिक कारने एका सिंगल चार्जमध्ये तब्बल 1008 किलोमीटरचा प्रवास केला आहे. विशेष म्हणजे, हा रेकॉर्ड कोणत्याही लॅब टेस्टमध्ये नव्हे तर सातत्यपूर्ण हायवे स्पीडवर साध्य करण्यात आला आहे.

कुठे आणि कसा झाला हा रेकॉर्ड?

Renault ने हा विक्रम 18 डिसेंबर रोजी मोरोक्कोमधील UTAC टेस्ट सर्किटवर नोंदवला. या टेस्टिंगदरम्यान Filante Record 2025 सरासरी 102 किमी/तास वेगाने धावली. संपूर्ण 1,008 किमीचा प्रवास कारने 9 तास 52 मिनिटांत पूर्ण केले आहे.

Hyundai च्या ‘या’ Car ने फोडला इतर ब्रँड्सना घाम! 2025 मध्ये दररोज विकले गेले 550 युनिट्स

तीच बॅटरी, पण वेगळी विचारधारा

या रेकॉर्डमागे कारची बॅटरी महत्त्वाची भूमिका बजावते. Filante Record 2025 मध्ये 87 kWh क्षमतेची बॅटरी वापरण्यात आली आहे, जी Renault Scenic E-Tech Electric मध्येही दिली जाते. फरक बॅटरीच्या आकारात नाही, तर ऊर्जा कार्यक्षमतेत आहे. या डेमो कारने केवळ 7.8 kWh प्रति 100 किमी इतकी ऊर्जा वापरली आहे, जी आजच्या बहुतांश प्रॉडक्शन EV पेक्षा खूपच कमी आहे.

इतकेच नव्हे, तर 1,008 किमी प्रवास केल्यानंतरही बॅटरीत 11% चार्ज शिल्लक होता. त्यामुळे ही कार 100 किमी/तासाहून अधिक वेगाने आणखी सुमारे 120 किमी चालू शकली असती.

एअरोडायनामिक्स ठरला गेम चेंजर

मोठी बॅटरी बसवण्याऐवजी Renault ने कारच्या डिझाइन आणि इंजिनिअरिंगवर भर दिला. Filante Record 2025 चे वजन अवघे 1,000 किलोग्रामआहे. यासाठी कार्बन फायबर आणि हलक्या ॲल्युमिनियम पार्ट्सचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. काही घटक 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहेत.

Year Ender 2025: ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी कसे होते 2025 चे वर्ष? किती कार झाल्या लाँच? किती झाली विक्री?

भविष्यातील तंत्रज्ञानाची रेनॉल्टने दाखवली झलक

Renault Filante Record 2025 ही केवळ विक्रम करणारी कार नसून, ती एक चालती-बोलती टेक्नॉलॉजी बेस्ड कार आहे. यात Steer-by-wire आणि Brake-by-wire सिस्टिम देण्यात आल्या असून, पारंपरिक मेकॅनिकल लिंक काढून टाकण्यात आल्या आहेत. Michelin ने या कारसाठी खास लो-रोलिंग-रेझिस्टन्स टायर्स तयार केले आहेत, तर पावरट्रेन, चेसिस आणि कार्बन स्ट्रक्चरचे काम Ligier ने केले आहे.

भविष्यातील EV साठी Renault चा संदेश

Renault च्या मते, इलेक्ट्रिक वाहनांची प्रत्यक्ष वापरातील रेंज वाढवण्यासाठी नेहमीच मोठी बॅटरी आवश्यक नाही. कार हलकी असेल, उत्तम एअरोडायनामिक्ससह डिझाइन केली असेल आणि ऊर्जा नुकसान कमी केले गेले, तर उत्कृष्ट रेंज मिळवता येते. जरी Filante Record 2025 प्रॉडक्शनमध्ये आणण्याची कंपनीची योजना नसली, तरी या कारमधील इंजिनिअरिंग आणि तंत्रज्ञान भविष्यातील Renault इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नक्कीच पाहायला मिळेल.

Web Title: Renault demo electric car filante record 2025 covered 1008 km distance on single charge

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2025 | 08:33 PM

Topics:  

  • automobile
  • Record
  • Renault

संबंधित बातम्या

Hyundai च्या ‘या’ Car ने फोडला इतर ब्रँड्सना घाम! 2025 मध्ये दररोज विकले गेले 550 युनिट्स
1

Hyundai च्या ‘या’ Car ने फोडला इतर ब्रँड्सना घाम! 2025 मध्ये दररोज विकले गेले 550 युनिट्स

आफ्टरमार्केटमधील बनावट आणि पुरवठा अडचणींवर उपाय! Partnr कडून अस्सल ICE आणि EV दुचाकी स्पेअर पार्ट्स लाँच
2

आफ्टरमार्केटमधील बनावट आणि पुरवठा अडचणींवर उपाय! Partnr कडून अस्सल ICE आणि EV दुचाकी स्पेअर पार्ट्स लाँच

Year Ender 2025: ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी कसे होते 2025 चे वर्ष? किती कार झाल्या लाँच? किती झाली विक्री?
3

Year Ender 2025: ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी कसे होते 2025 चे वर्ष? किती कार झाल्या लाँच? किती झाली विक्री?

2026 मध्ये कार खरेदी करण्याचे स्वप्न महागणार! ‘या’ कंपन्यांनी दरवाढीची केली घोषणा
4

2026 मध्ये कार खरेदी करण्याचे स्वप्न महागणार! ‘या’ कंपन्यांनी दरवाढीची केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.