Studds कडून हाफ फेस हेल्मेटची नवी Vogue Series लाँच
भारतात दुचाकीच्या विक्रीत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. आता दुचाकी आली की हेल्मेट वापरणे आलेच. दुचाकी चालवताना हेल्मेट न वापरल्यास ट्राफिक पोलीस हजारोंचा फाइन चार्ज करत असतात. मात्र, हेल्मट खरेदी करताना नेमक्या कोणता कंपनीचा हेल्मेट वापरावा याबाबत रायडर्स गोंधळात असतात.
मार्केटमध्ये अनेक हेल्मेट उत्पादक कंपन्या आहेत. Studds ही त्यातीलच एक. नुकतेच स्टड्सने सुरक्षितता आणि उत्कृष्ट ग्राफिक्ससह Vouge ही एक नवीन हेल्मेट सिरीज बाजारात आणली आहे. चला जाणून घेऊयात हे हेल्मेट कोणत्या किमतीत लाँच करण्यात आले आहे.
स्टड्सने व्हूज नावाच्या हाफ फेस हेल्मेटची एक नवीन सिरीज बाजारात आणली आहे. ती Vouge डी१ स्क्वेअर या नावाने लाँच करण्यात आली आहे. त्यात उत्कृष्ट ग्राफिक्स देण्यात आले आहेत.
CNG Car खरेदी करताना ‘या’ पर्यायांवरून ग्राहकांची नजरच हटत नाही, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी
निर्मात्यांच्या माहितीनुसार, या सिरीजला आकर्षक ग्राफिक्ससह मॅट आणि ग्लॉसी फिनिशचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
Studds Vogue D1 Square सिरीज क्विक-रिलीज चिन स्ट्रॅप, ईपीएस हायपोअॅलर्जेनिक लाईनर आणि टॉप एअर एक्झॉस्टसह सादर करण्यात आली आहे.
Studds Accessories चे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ भूषण खुराना म्हणाले, “STUDDS मध्ये आम्ही नेहमीच सुरक्षितता आणि आराम या आमच्या मूलभूत वचनाशी प्रामाणिक राहत आलो आहे. ग्राहकांच्या शैली व आवडीनुसार आमची उत्पादने सतत विकसित करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित करतो. रायडर्सच्या समकालीन डिझाइनच्या वाढत्या मागणीमुळे आम्हाला आमच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या हेल्मेटपैकी एक असलेल्या Vogue Series ला नवे रूप द्यावेसे वाटले. या लोकप्रिय मालिकेत आता आकर्षक व उत्साही ग्राफिक्सची भर घालताना आमचे उद्दिष्ट रायडर्सना असे उत्पादन देणे आहे, जे केवळ सुरक्षित आणि विश्वासार्हच नव्हे तर देखणेही वाटेल. पुरुष आणि महिलांसाठी डिझाइन केलेला हा हलका ओपन-फेस हेल्मेट आधुनिक डिझाइनसोबतच विश्वासार्ह सुरक्षिततेचे परिपूर्ण कॉम्बिनेश आहे.”
ही सिरीज स्टड्सने 6 रंगांच्या पर्यायांसह लाँच केली आहे. यामध्ये काळा आणि पेस्टल निळा, काळा, पांढरा आणि लाल, काळा आणि गुलाबी, काळा आणि लाल, काळा आणि राखाडी, काळा आणि निळा असे कलर ऑप्शन्स समाविष्ट आहेत.
कंपनीने ISI सुरक्षिततेसह देऊ केलेल्या या सिरीजच्या हेल्मेटची किंमत 1095 रुपयांपासून सुरू होते. ते ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पध्दतीने खरेदी करता येईल.