
कारचा AC ऑन करताच दुर्गंधी येतेय? (Photo Credit- AI)
कारच्या AC यंत्रणेत एक ‘केबिन एअर फिल्टर’ बसवलेला असतो. याचे मुख्य काम बाहेरची धूळ आणि कचरा कारच्या आत येण्यापासून रोखणे हे असते. कालांतराने या फिल्टरमध्ये धूळ, माती आणि ओलावा साचतो, ज्यामुळे तिथे बुरशी वाढते आणि दुर्गंधी येऊ लागते.
अनेकजण कार बंद करताना थेट इंजिनसह AC बंद करतात. यामुळे AC च्या डक्ट्समध्ये ओलावा तसाच राहतो. या ओलाव्यामुळे तिथे बॅक्टेरिया आणि फंगस (बुरशी) तयार होतात.
कारच्या डॅशबोर्डवरील AC व्हेंट्समध्येही धूळ साचते. जर हे व्हेंट्स बराच काळ साफ केले नाहीत, तर त्यातून येणारी हवा दुर्गंधीयुक्त आणि ॲलर्जी पसरवणारी असू शकते.
जर तुम्ही AC मधील दुर्गंधीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केले, तर त्याचा परिणाम केवळ तुमच्या नाकावरच नाही, तर कारच्या कूलिंग क्षमतेवरही होतो. काहीवेळा गॅस गळती किंवा AC कॉईलमधील मोठ्या प्रमाणातील घाण यामुळेही हा वास येतो.
Car Key Features: तुमच्या CAR च्या चावीमध्ये लपलेत ‘हे’ भन्नाट फिचर्स, जाणून घ्या