
आता काही खरं नाही! HSRP नंबर प्लेटसाठी काउंटडाउन सुरू; मंत्री, खासदार, आमदारांनाही सूट नाही
परिवहन विभागाच्या माहितीनुसार, गुन्हेगारी घटनांमध्ये बनावट किंवा साध्या नंबर प्लेटचा गैरवापर होत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. यामुळे वाहनांची अचूक ओळख पटावी आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणांना मदत व्हावी, यासाठी सर्व वाहनांवर HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, राज्यातील जुन्या वाहनांपैकी आतापर्यंत सुमारे एक कोटी वाहनांवर HSRP नंबर प्लेट बसविण्यात आल्या आहेत. मात्र, एकूण जुन्या वाहनांपैकी केवळ ५५ ते ५६ टक्के वाहनधारकांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित वाहनधारकांनी ३१ डिसेंबरपूर्वी HSRP बसवून घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले.
सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, मंत्री, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी किंवा सर्वसामान्य नागरिक, नियम सर्वांसाठी समान आहेत. HSRP नंबर प्लेटबाबत कोणालाही कोणतीही विशेष सूट दिली जाणार नाही.
तसेच, ३१ डिसेंबरनंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि लोकप्रतिनिधींच्या वाहनांवरही समान पद्धतीने कारवाई होईल, असे परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे वाहनधारकांनी अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर HSRP नंबर प्लेट बसवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
HSRP (High Security Registration Plate) म्हणजे वाहनासाठी तयार करण्यात आलेली उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट असते. ॉ ही प्लेट अॅल्युमिनियमपासून बनविली जाते आणि तिच्यावर विविध सुरक्षा वैशिष्ट्ये (Security Features) असतात. बनावट नंबर प्लेट रोखणे, वाहनांची ओळख सहज पटवणे आणि गुन्हेगारी घटनांमध्ये वाहनांचा मागोवा घेणे हा या प्लेटचा मुख्य उद्देश आहे.
अॅल्युमिनियमची मजबूत प्लेट – सहज खराब किंवा बदलता येत नाही.
लेझर-कोड (Laser Engraved Unique Serial Number) – प्रत्येक प्लेटला वेगळा क्रमांक असतो.
क्रोमियम-आधारित होलोग्राम – बनावट प्लेट ओळखणे सोपे होते.
नॉन-रिमूवेबल स्नॅप लॉक – प्लेट काढल्यास ती पुन्हा पूर्ववत बसवता येत नाही.
रिफ्लेक्टिव्ह शीट – रात्रीही नंबर स्पष्ट दिसतो.
विंडशील्डवर कलर स्टिकर – इंधनाचा प्रकार (पेट्रोल, डिझेल, CNG, इलेक्ट्रिक) दर्शवणारा स्टिकर दिला जातो.
HSRP Maharashtra: वाहन सुरक्षेसाठी मोठा निर्णय! HSRP नंबर प्लेट आता अनिवार्य, अन्यथा…
Ans: वाहन चोरी आणि बनावट नंबर प्लेटला आळा घालण्यासाठी. गुन्ह्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वाहनांची ओळख जलद पटण्यासाठी. वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी. देशभर एकसमान आणि सुरक्षित वाहन नोंदणी प्रणाली निर्माण करण्यासाठी.
Ans: राज्यातील जुन्या आणि नव्या सर्व वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. नव्या वाहनांवर ही प्लेट कंपनीकडूनच बसवून दिली जाते, तर जुन्या वाहनधारकांनी अधिकृत केंद्रावर जाऊन ती बसवून घेणे आवश्यक आहे.
Ans: निर्धारित मुदतीनंतर HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत HSRP नंबर प्लेट बसवून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.