फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात अनेक कार्स आहेत, ज्या मार्केटमध्ये लोकप्रिय ठरल्या आहेत. यामागील कारण म्हणजे त्या कार्सचा दमदार परफॉर्मन्स आणि बजेट फ्रेंडली किंमत. त्यात आता केंद्र सरकारने GST कमी केल्यानंतर वाहनांची किंमत अजूनच स्वस्त झाल्या आहेत. पूर्वी कार खरेदी करताना 28 टक्के जीएसटी भरावा लागायचा. मात्र, आता 18 टक्के जीएसटी भरावा लागणार आहे. हा बदल येत्या 22 सप्टेंबरपासून अमलात आणला जाणार आहे.
देशातील ऑटो मार्केटमध्ये सेडान सेगमेंटमध्ये मारुती डिझायर ही नंबर-1 कार आहे. तसेच या कारसोबत अन्य कार देखील स्पर्धा करत असतात. यातीलच एक म्हणजे ह्युंदाई ऑरा जी डिझायरशी स्पर्धा करते. ऑरा किमतीच्या बाबतीत डिझायरपेक्षा स्वस्त आहे. त्याचबरोबर ती अनेक उत्तम फीचर्सने सुसज्ज आहे. अशा परिस्थितीत, 22 सप्टेंबरपासून ही कार खरेदी करणे आणखी स्वस्त होणार आहे.
नवीन जीएसटी स्लॅबचा परिणाम Hyundai Aura वरही दिसून येत आहे. यापूर्वी, त्याच्या सुरुवातीच्या ई व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 6,54,100 रुपये होती, जी आता 5,98,320 रुपयांवर आली आहे. म्हणजेच, 55,780 रुपयांचा टॅक्स कमी करण्यात आला आहे. एकूणच, व्हेरियंटनुसार, 76,316 रुपयांचा फायदा होईल.
महिंद्राची महत्वपूर्ण घोषणा! ‘हे’ इंधन वापरल्यास ग्राहकांना मिळणार फुल वॉरंटी
Hyundai Aura मध्ये 1.2-लिटर कप्पा पेट्रोल इंजिन आहे, जे 5-स्पीड मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन युनिटशी जोडलेले आहे. हे इंजिन 83 पीएस पॉवर आणि 113.8 Nm पीक टॉर्क जनरेट करते. 1.2–लिटर बाय-फ्युएल पेट्रोल इंजिनसह CNG व्हर्जन देखील असेल जे 69 पीएस पॉवर आणि 95.2 Nm पीक टॉर्क जनरेट करू शकते. कंपनीच्या दाव्यानुसार, त्याच्या CNG व्हेरिएंटचे मायलेज 28 किमी/किलो पर्यंत आहे.
देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आता अजूनच स्वस्त! GST कपातीनंतर नवीन किंमत फक्त…
Hyundai ने Aura च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये 30 हून अधिक नवीन सेफ्टी फीचर्स जोडली आहेत. साइड आणि कर्टन एअरबॅग्जसह, ग्राहकांना 4 एअरबॅग्ज स्टँडर्ड आणि 6 एअरबॅग्जचा पर्याय देखील मिळेल. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट आणि हिल असिस्ट कंट्रोल सारखी फीचर्स देखील कारमध्ये देण्यात आली आहेत. यात फूटवेल लाइटिंग, टाइप सी फ्रंट यूएसबी चार्जर आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आहे. यात नवीन LED DRLS आणि कनेक्टेड डिझाइनसह LED टेल लॅम्प आहेत.