देशातील सर्वात स्वस्त 7 सीटर कार आता अजूनच स्वस्त! (फोटो सौजन्य: @WorldOfCarsIND/X.com)
भारतीय मार्केटमध्ये अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करतात. यातही आता नवीन जीएसटी दरांमुळे ग्राहकांना थोडा दिलासा मिळाला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीएसटीत बदल करणार अशी घोषणा केली होती. यानंतर केंद्र सरकारने नवीन GST दरांची घोषणा केली. यानुसार छोट्या वाहनांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आली आहे. यामुळे अनेक वाहनांची किंमत कमी झाली आहे.
रेनॉल्ट इंडियाने फेस्टिव्ह सिझनपूर्वीच ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. कंपनीने घोषणा केली आहे की GST 2.0 कपातीचा संपूर्ण फायदा थेट ग्राहकांना दिला जाईल. यानंतर, रेनॉल्टच्या कार्स पूर्वीपेक्षा अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत. कंपनीने सांगितले की त्यांच्या वाहनांच्या किमती 96 हजार रुपयांपेक्षा जास्त कमी झाल्या आहेत.
ग्राहकांचे ‘अच्छे दिन’ आलेत! नवीन GST च्या दारानंतर ‘ही’ कार झाली डायरेक्ट 1.32 लाख रुपयांनी स्वस्त
जीएसटी कपातीनंतर, देशातील सर्वात स्वस्त 7-सीटर रेनॉल्ट ट्रायबरच्या किमतीही कमी झाल्या आहेत. जीएसटी कपातीनंतर ही कार आणखी परवडणारी झाली आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रेनॉल्टच्या मते, ट्रायबरच्या सर्व व्हेरिएंटच्या किमती सुमारे 8.5 टक्क्यांनी कमी होतील. सर्वात मोठा फायदा इमोशनल पेट्रोल-ऑटोमॅटिक व्हेरिएंटच्या खरेदीदारांना होईल, ज्याची किंमत आता सुमारे 78,195 रुपयांनी कमी होईल.
7-सीटर असूनही, रेनॉल्ट ट्रायबर कॉम्पॅक्ट आकारात येते, जी शहरांवरील रस्ते आणि महामार्ग दोन्हीसाठी योग्य मानली जाते. सीट्स फोल्ड केल्यानंतर, त्यात 625 लिटरपर्यंत बूट स्पेस मिळते.
रेनॉल्ट ट्रायबरच्या इंटिरिअरमध्ये सुद्धा अनेक बदल करण्यात आले आहेत. तुम्हाला नवीन ड्युअल-टोन थीम, चांगल्या दर्जाचे मटेरियल फिनिश आणि काही प्रगत फीचर्स पाहायला मिळतील. नवीन ट्रायबरमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम सारखी फीचर्स दिली जाऊ शकतात अशी अपेक्षा आहे.
रेनॉल्ट ट्रायबर फेसलिफ्टच्या मेकॅनिकल सेटअपमध्ये कोणतेही मोठे बदल होणार नाहीत. यात आतापर्यंत उपलब्ध असलेले 1.0-लिटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल. हे इंजिन सुमारे 72 बीएचपी पॉवर आणि 96 एनएम टॉर्क जनरेट करते. गिअरबॉक्स पर्यायांमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी ट्रान्समिशन देखील उपलब्ध असेल, ज्यामुळे हे मॉडेल 7-सीटर शोधणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य ठरेल.