Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी Hyundai Creta एका क्षणार्धात होईल तुमची! जाणून घ्या Down Payment आणि एमी

ह्युंदाई क्रेटा ही देशातील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. हीच एसयूव्ही जर तुम्ही 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंवर खरेदी केली तर मग दरमहा किती EMI द्यावा लागेल. याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 18, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई क्रेटा ही ग्राहकांची आवडती एसयूव्ही
  • 2 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI?
  • जाणून घ्या फायनान्स प्लॅन
भारतीय ऑटो बाजारात SUV सेगमेंटमध्ये अनेक उत्तम कार पाहायला मिळतात. 2025 मध्ये तर ग्राहकांनी सर्वाधिक प्रतिसाद एसयूव्ही वाहनांना दिला आहे. जर तुम्ही देखील तुमच्या कुटुंबासाठी एक चांगली एसयूव्ही शोधत असाल तर Hyundai Creta तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते.

भारतीय बाजारात अनेक सेगमेंटमध्ये वाहने विक्री करणाऱ्या Hyundai Motor India कडून मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये Hyundai Creta ऑफर केली जाते. जर तुम्ही या एसयूव्हीचा बेस व्हेरिएंट खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि 2 लाख रुपये डाउन पेमेंट देण्याचा प्लॅन करत असाल, तर दरमहा किती ईएमआय भरावा लागेल, हे जाणून घेऊया.

Hyundai Alcazar आणि Tata Safari ला आलंय टेन्शन! 7 सीटर पर्यायामध्ये Toyoyta Hyryder लाँच होण्याची शक्यता

Hyundai Creta ची किंमत किती?

Hyundai कडून Creta चा डिझेल बेस व्हेरिएंट ‘E’ सुमारे 10.79 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. ही कार खरेदी केल्यास एक्स-शोरूम किमतीव्यतिरिक्त नोंदणी शुल्क, विमा आणि इतर चार्जेस भरावे लागतात.

नोंदणी कर: सुमारे 1.12 लाख रुपये

विमा: अंदाजे 52 हजार रुपये

TCS आणि फास्टॅग शुल्क: सुमारे 11 हजार रुपये

या सर्व खर्चानंतर या एसयूव्हीची ऑन-रोड किंमत सुमारे 12.54 लाख रुपये इतकी होते.

2 लाख रुपये डाउन पेमेंटनंतर किती EMI?

बँकेकडून साधारणपणे एक्स-शोरूम किमतीवरच कर्ज दिले जाते. अशा परिस्थितीत दोन लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर सुमारे 10.54 लाख रुपये कर्ज घ्यावे लागेल. जर बँकेकडून 9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी 10.54 लाख रुपयांचे कर्ज मिळाले, तर दरमहा सुमारे 16,960 रुपये ईएमआय भरावी लागेल.

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

कार किती महाग पडेल?

9 टक्के व्याजदराने 7 वर्षांसाठी कर्ज घेतल्यास एकूण कालावधीत सुमारे 3.70 लाख रुपये व्याज भरावे लागेल. अशा प्रकारे एक्स-शोरूम किंमत, ऑन-रोड खर्च आणि व्याज मिळून या एसयूव्हीची एकूण किंमत अंदाजे 16.24 लाख रुपये इतकी होऊ शकते.

कोणाशी आहे स्पर्धा?

मिड-साइज एसयूव्ही सेगमेंटमध्ये Creta ची थेट स्पर्धा Toyota Urban Cruiser हैरीडर, MG Hector, Maruti Grand Vitara आणि Mahindra Scorpio यांसारख्या मॉडेल्सशी होतो.

 

Web Title: Hyundai creta emi after 2 lakh rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • SUV

संबंधित बातम्या

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स
1

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
2

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
3

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
4

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.