लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?
भारतीय बाजारात विविध सेगमेंटमध्ये चांगल्या कार ऑफर होत असतात. यातही एसयूव्ही सेगमेंटमधील कारला चांगली मागणी मिळताना दिसते. नुकतेच देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी Maruti Suzuki ने नवीन मिड साइझ एसयूव्ही ऑफर केली आहे.
देशातील आघाडीची कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने अलीकडेच आपली नवीन मिड-साइज SUV – Victoris लाँच केली आहे. ही SUV Hyundai Creta ला थेट स्पर्धा देते. Victoris ही कार मारुतीच्या Nexa लाइनअपमध्ये समाविष्ट करण्यात आली असून, प्रीमियम ग्राहकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने सादर केली गेली आहे. चला तर मग जाणून घेऊया की मारुती Victoris आणि Hyundai Creta यामधून कोणती SUV तुमच्यासाठी अधिक चांगली ठरते?
Hyundai Creta ही मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये अनेक वर्षांपासून आघाडीवर आहे. यामध्ये आधुनिक डिझाईन आणि उत्तम फीचर्स दिले गेले आहेत. यात पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि ADAS सारख्या अत्याधुनिक सुविधा मिळतात. परफॉर्मन्स आणि प्रीमियम फील यामुळे Creta ही SUV कुटुंब आणि तरुण ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी
Maruti Victoris मध्ये पेट्रोल आणि हायब्रिड इंजिन पर्याय दिले जाणार आहेत. यामुळे या कारचा मायलेज Hyundai Creta आणि Kia Seltosच्या तुलनेत अधिक असेल. तर दुसरीकडे, Hyundai Creta मध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही इंजिन ऑप्शन्स उपलब्ध आहेत, जे ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गिअरबॉक्ससह येतात.
Creta चा मायलेज इंजिन व्हेरिएंटनुसार बदलतो, परंतु बहुतांश वेळा तो 17-18 किमी/लीटर च्या आसपास असतो. Creta मध्ये लोकप्रिय डिझेल इंजिन दिला आहे, जो अजूनही भारतात अनेक भागांमध्ये पसंत केला जातो.
Maruti Victoris मध्ये 6 एअरबॅग्स, 360-डिग्री कॅमेरा आणि कनेक्टेड कार टेक्नोलॉजी दिली आहे. तर Creta मध्ये आधीपासूनच ADAS, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग आणि ब्लूलिंक कनेक्टिविटी सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
Thalapathy Vijay च्या ताफ्यात एकापेक्षा एक Luxury Cars चा समावेश, किंमत तर विचारूच नका
Maruti Victoris ची सुरुवातीची किंमत सुमारे 10.5 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, तर Hyundai Creta ची किंमत 11 लाख ते 20 लाख रुपयांपर्यंत आहे.
हायब्रिड व्हेरिएंट्सच्या उपलब्धतेमुळे आणि किंमतीच्या दृष्टीने पाहता, Victoris ही Creta च्या तुलनेत अधिक किफायतशीर पर्याय ठरते.
जर तुम्हाला अधिक मायलेज आणि हायब्रिड टेक्नोलॉजीसोबत किफायतशीर कार हवी असेल, तर Maruti Victoris तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. पण जर तुम्हाला अधिक प्रीमियम फील, डिझेल इंजिनचा पर्याय आणि टेक्नोलॉजी-फोकस्ड फीचर्स हवे असतील, तर Hyundai Creta ही अजूनही चांगली निवड आहे.