Thalapathy Vijay च्या ताफ्यात एकापेक्षा एक लक्झरी कार
साऊथच्या सुपरस्टार अभिनेत्यांची बातच काही और असते. असाच एक सुपरस्टार म्हणजे थालापती विजय. सुपरस्टार विजयने सिनेसृष्टीला राम राम ठोकला असून त्याने स्वतःची पॉलिटिकल पार्टी सुरु केली. नुकतेच त्याच्या एका रॅलीत प्रचंड गर्दी झाली होती. जिथे चेंगराचेंगरी सुद्धा झाली. यामुळे काही नागरिकांना जीव देखील गमवावा लागला आहे. या घटनेमुळे विजय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
तमिळ चित्रपटसृष्टीचा सुपरस्टार थालापती विजय केवळ त्याच्या अभिनय आणि लोकप्रियतेसाठीच नाही तर त्याच्या प्रभावी कार कलेक्शनसाठी देखील ओळखला जातो. त्याच्या गॅरेजमधील प्रत्येक कार त्याच्या स्टारडम आणि आलिशान लाइफस्टाइलचे उदाहरण आहे. त्याच्या संग्रहात रोल्स रॉयस सारख्या अति-आलिशान कारपासून ते मारुती सेलेरियो सारख्या साध्या कारपर्यंत सर्व काही समाविष्ट आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Toyota ची ‘ही’ SUV फक्त काहीच सेकंदात तुमच्या घरी होईल दाखल, फक्त इतकाच असेल EMI?
विजयच्या कलेक्शनमधील सर्वात खास कार म्हणजे रोल्स रॉयस घोस्ट. तब्बल 7 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेली ही कार अंतिम लक्झरी आहे. यात ट्विन-टर्बो V12 इंजिन आणि हॅन्डक्राफटेड इंटिरिअर आहेत. त्याची राइड क्वालिटी विजयच्या स्टारडमवर अधिक प्रकाश टाकते.
रेंज रोव्हर इव्होक ही विजयकडील स्पोर्टी कारपैकी एक आहे. याच्या ऑफ-रोडिंग क्षमता आणि आलिशान फीचर्समुळे ही कार सेलिब्रिटींमध्ये खूप लोकप्रिय आहे. शहरात कार चालवायची असो किंवा विकेंड ट्रिप, इव्होक प्रत्येक प्रसंगासाठी योग्य आहे.
विजयची फोर्ड मस्टंग ही अमेरिकन मसल कारचे उत्तम उदाहरण आहे. दमदार V8 इंजिन, रेट्रो डिझाइन आणि रस्त्यावरची याची जबरदस्त उपस्थिती यामुळे ही त्यांच्याकडील सर्वात खास कारपैकी एक आहे. दुसरीकडे, व्होल्वो एक्ससी90 ही त्यांची व्यावहारिक निवड दर्शवते. ही एसयूव्ही तिच्या सुरक्षिततेसाठी आणि स्कॅन्डिनेव्हियन डिझाइनसाठी प्रसिद्ध आहे.
अरे Maruti Suzuki Ertiga स्वस्त झाली रे! मिळणार पहिल्यापेक्षा जास्त फीचर्स, नवीन किंमत…
विजय यांच्या कारच्या संग्रहात मर्सिडीज-बेंझ जीएलए चाही समावेश आहे. ही कॉम्पॅक्ट आलिशान एसयूव्ही अतिशय स्टाइलिश आणि आरामदायक आहे. रोजच्या वापरासाठी ही कार सर्वात चांगली ब्रँड व्हॅल्यू (Brand Value) असणाऱ्या कारपैकी एक मानली जाते.
शहरात फिरण्यासाठी असलेली विजय यांची मिनी कूपर एस त्याच्या स्टायलिश व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते. कॉम्पॅक्ट असली तरी दमदार इंजिन आणि खास डिझाइनमुळे ही त्यांच्याकडील सर्वात ‘कूल’ कारपैकी एक आहे.
या आलिशान कारव्यतिरिक्त, विजय यांच्याकडे टोयोटा इनोव्हा क्रिस्टा (Toyota Innova Crysta) आणि मारुती सुझुकी सेलेरिओ (Maruti Suzuki Celerio) देखील आहेत. इनोव्हा तिच्या भरवशाच्या परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे, तर सेलेरिओ त्यांची साधेपणाची आवड दर्शवते.